वाराणसी – जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सारनाथमधील लाधूपूर येथील एका विवाहित महिलेचे एका वाहनातून अपहरण करण्यात येत असताना या महिलेने आरडाओरडा केल्याने स्थानिक लोकांनी पाच जणांना अडविले. यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जेव्हा या पाच जणांना त्या महिलेसह सारनाथ पोलिस ठाण्यात आणले. तेव्हा चौकशीत उघडकीस आलेले प्रकरण पाहून पोलिसांच्या भुवया उंचावल्या. कारण या महिलेने या पाच जणांकडून वेगवेगळ्या वेळी लग्न करण्यासाठी पैसे घेतले होते.
सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरू केला आहे. मूळ बलुआ (ता. चांदौली) येथील ही महिला लेधूपूर गावात आपल्या रिक्षा चालक पतीसह भाड्याच्या घरात राहत आहे. तसेच ऑर्केस्ट्रामध्ये ती नृत्य कार्य करते, ऑर्केस्ट्रामध्येच काम करणारे गौरा येथील रहिवासी असलेल्या पाच जणांशी लग्न करण्यासाठी तिने पैसे घेतले आहे. शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजता पाचही जण लाधूपूर येथे एका वाहनातून आले आणि त्यांच्याबरोबर त्या महिलेला वाहनात बसवून पळून नेऊ लागले. पांडेपुरात येथे पोलीस ठाण्यात आणले तेव्हा काहीतरी निमित्त करून ती पळून जाण्याचा प्रयत्न करीत होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक सारनाथ इंद्रभूषण यादव म्हणाले की, ही घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.