नाशिक : बदलत्या वातावरणात व अस्थिरतेच्या काळामध्ये समाजात नितीमुल्याची जोपासना होण्यासाठी वारकरी भाविकांचे संघटन ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र वारकरी महामंडळाची स्थापना ही वै .हभप रामदास महाराज मनसुख यांनी निस्वार्थ भावनेतुन केली आहे. या संघटनेच वैशिष्ट हे की वारकरी महामंडळाचे माध्यमातुन हभप बंडातात्या कराडकर यांनी व कार्याध्यक्ष हभप रामेश्वर महाराज शास्री यांचे मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे व आंदोलनाला यश आले, असे प्रतिपादन महाराष्ट्र वारकरी महामंडळ युवा समितीचे जिल्हाध्यक्ष हभप संदिप महाराज खकाळे यांनी श्री. तुळजाभवानी माता मंदिर म्हाडा काॅलनी सातपुर ( नाशिक ) येथे आयोजित बैठकीत केले.
यावेळी संदिप महाराज म्हणाले की, पंढरपुर विठ्ठल मंदिराचा लढा असेल किंवा अन्य समस्या या कार्याकरिता महामंडळाचे योगदान मोलाचे ठरले आहे. आजपर्यंत जी माणस महामंडळात आली ,ती माणस खुप गुणी आहेत .हा आजवरचा ईतिहास आहे.जिल्हाभरातील सर्वच अधिकारी महात्मे,प्रसिध्द किर्तनकार,गुणीजन महामंडळात स्वईच्छेने सभाग घेऊन सेवा करत आहेत.अर्थात आज खरोखर संघटन ही काळाची गरज आहे ,असेही संदिप महाराज खकाळे यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी श्री. तुळजाभवानी माता मंदिर म्हाडा काॅलनी सातपुर नाशिक येथे महाराष्ट्र वारकरी महामंडळ फलक अनावरण करण्यात आले. या फलकाचे अनावरण श्रीराम वारकरी मंडळाचे अध्यक्ष हभप पोपटराव फडोळ अंबड,यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष हभप आण्णासाहेब महाराज आहेर,तालुकाध्यक्ष हभप लहु महाराज आहिरे,कार्याध्यक्ष हभप मोहन महाराज पगार,संघटक हभप सुदर्शन महाराज शिंदे, उपाध्यक्ष हभप सोपान महाराज, जयंत महाले आदी उपस्थीत होते. यावेळी हभप देवीदास महाराज पवार यांची जाधव टाऊन,जाधव संकुल व चुंचाळे परिसर विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.