मुंबई – खासकरुन सोनीच्या विविध चॅनलवर सातत्याने दाखविल्या जाणाऱ्या सूर्यवंशम चित्रपटाला असंख्य प्रेक्षक कंटाळले आहेत. त्यामुळेच या चित्रपटाची अनेकदा खिल्लीही उडविली जाते आणि सोशल मिडीयात ही बाब चर्चेची राहते. या चित्रपट प्रदर्शनाची दखल आता अभिनेता अनुपम खेर यांनीही घेतली आहे. म्हणूनच त्यांनी अतिशय खोचक टिपण्णी करुन या चित्रपट प्रदर्शनाचा खरपूस समाचार घेतला आहे.
बघा अनुपम खेर यांची ही पोस्ट
https://twitter.com/AnupamPKher/status/1366012851459035139