मुंबई – कोरोना संक्रमणामुळे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर सातत्याने वाढतच आहे. अर्थात वर्क फ्रॉम होममध्ये वाय–फायच्या स्पीडच्या समस्येचा सामनाही करावा लागत आहे. मात्र आता टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही, कारण आज आम्ही तुम्हाला वाय–फायची स्पीड वाढविण्यासाठी काही टिप्स देणार आहोत…
इंटरनेटचा स्पीड तपासा
तुमचे इंटरनेट किंवा वाय–फाय स्लो झाले असेल तर सर्वांत पहिले त्याची स्पीड तपासून घ्या. त्यासाठी तुम्हाला स्पीड टेस्टींग वेबसाईट www.speedtest.net किंवा www.fast.com चा वापर करू शकता. इथे तुम्हाला आटोमॅटिकली तुमच्या इंटरनेटची डाऊनलोड आणि अपलोडची स्पीड बघायला मिळेल.
किती डिव्हाईस कनेक्ट आहेत?
वाय–फाय स्लो झाले असेल तर पहिले त्याला किती डिव्हाईस कनेक्ट आहेत, हे तपासून बघा. कारण बरेचदा जास्त डिव्हाईस कनेक्ट असल्यामुळेही स्पीड कमी होते. याशिवाय तुम्ही वर्क फ्ऱम होत करीत असाल तर एकदा सर्व्हिस प्रोव्हाईडरशी संपर्क साधून सर्वोत्तम प्लानची माहिती घ्या.
राऊटर रिबूट करा
वर्क फ्रॉम होममुळे राऊटर पूर्ण दिवस एक्टीव्ह राहते. त्यामुळे बरेचदा ते गरम होऊन जाते. अश्यात राऊटर थोड्यावेळ बंद करून बघा. किंवा राऊटर रिबूट करून बघा. यामुळे राऊटर योग्यपद्धतिने काम करेल आणि इंटरनेटची स्पीडही वाढेल.
योग्य जागेवर ठेवा वाय–फाय राऊटर
वाय–फाय राऊटर चुकीच्या जागेवर ठेवल्यामुळेही बरेचदा इंटरनेटच्या स्पीडवर परिणाम होतो. खोलीच्या कोपऱ्यात राऊटर ठेवले असेल तर इंटरनेटची स्पीड कमी मिळेल. अश्यात खोलीच्या मध्यभागी राऊटर ठेवून बघा.