नाशिक – मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर मका खरेदी थांबविण्यात आली होती परंतु शेतकऱ्यांकडे अजूनही चांगल्या प्रतीचा मका शिल्लक असल्याने शेतकरी पुन्हा मका खरेदी होईल की नाही यामुळे चिंतातुर होते . त्यासाठी केंद्राची परवानगी मिळणे आवश्यक असतांना खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्राकडे वाढीव मका खरेदीची मागणी केली .राज्याच्या वाढीव मका व ज्वारी या धान्य खरेदीचे वितरण आराखडा केंद्राला देताच आठवड्याच्या आत केंद्र सरकारने तत्परतेने पावले उचलत, राज्य सरकारच्या वाढीव धान्यखरेदीस मंजुरी दिली आहे.
वाढीव मका व ज्वारी खरेदीची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र त्याची वितरण कसे करणार याबाबत काही कळविले नव्हते. त्याची माहिती लवकर दिल्यास त्यास तातडीने परवानगी मिळेल अशी तयारी केंद्र सरकारने दाखविली .दि. ४ -१- २०२१ रोजी राज्य सरकारक़डून नियोजनाचे वितरण पत्र केंद्रास पाठविण्यात आले. वाढीव मका खरेदी साठी खा. डॉ भारती पवार यांनी याबाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे पत्रव्यवहार करत तसेच प्रत्यक्षात भेटून प्रयत्न केले व केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे यांनी वाढीव मका खरेदीला परवानगी दिली . यापूर्वी ही केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी खुली करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला तसेच आताही वाढीव मका खरेदीला परत परवानगी दिल्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे .केंद्र सरकार नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देत असून कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे .याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय मंत्री पियुष गोयल , केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खा .डॉ .भारती पवार यांनी आभार मानले.