शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाचाळवीर कंगना आणि अर्णब यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव

by India Darpan
सप्टेंबर 8, 2020 | 10:26 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
NPIC 20209815822

मुंबई –  अभिनेत्री कंगना राणावत आणि रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संचालक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज (८ सप्टेंबर) विधान परिषदेत हक्कभंग प्रस्तावाची सूचना मांडण्यात आली. राणावत हिच्या विरोधात काँग्रेसचे भाई जगताप यांनी तर गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला.

गोस्वामी यांनी त्यांच्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, सातत्यानं राज्याचे प्रमुख आणि सरकार यांच्याविरोधात एकांगी विधानं करून शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालवल्याबद्दल हा हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.   विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल करून घेतला आणि नियमानुसार कारवाई करण्याची सूचना केली. यामुळे मंत्री आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक होऊन कामकाज आज तीनदा तहकूब झालं.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या सूचना स्वीकारल्या असून यावर नंतर निर्णय देणार असल्याचं जाहीर केलं. अनेकांच्या बलिदानातून मिळालेल्या मुंबईचा अपमान करून कंगनानं मुंबईशी गद्दारी केली आहे अशी टीका जगताप यांनी हा हक्कभंग प्रस्ताव मांडताना केली.   शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी ही मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रानावत हिनं महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचा अपमान केला आहे. याचा सर्व पक्षांनी निषेध केला पाहिजे, अशी अपेक्षा गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी नाईक यांच्या पत्नीनं आणि मुलीनं केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं अर्णब गोस्वामी यांची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोडी लिपीला तंत्रज्ञानाचा स्पर्श; व्हॉटस्अॅपद्वारे प्रशिक्षण वर्ग

Next Post

पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची स्वारीपची मागणी  

Next Post
download 1 1

पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची स्वारीपची मागणी  

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
AIR INDIA

अहमदाबाद विमान अपघात…एअर इंडियाच्या ३ अधिका-यांची हकालपट्टी

जून 21, 2025
World Record e1750492811590

१६९ देशांमधील ७,५२,०७४ लोकांनी एकत्र योग करत रचला विक्रम…

जून 21, 2025
cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011