वसंत पंचमी अर्थात सरस्वती पंचमी महात्म्य
दिनांक १६ फेब्रुवारी रोजी भारतभर वसंत पंचमी अर्थात सरस्वती पंचमी साजरी होत आहे. प्रत्येक वर्षी माघ शुक्ल पंचमीला हा उत्सव साजरा केला जातो.
अशी करा पूजा
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणा वर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना
या सरस्वती मंत्र पठणाने दिवसाची सुरुवात करावी. विद्येची देवी सरस्वती हिच्या पूजनाचे या दिवशी विशेष महत्त्व आहे. कोणत्याही प्रकारच्या नवीन शिक्षणाची सुरुवात या दिवशी करण्याचा प्रघात आहे. प्रामुख्याने विद्यार्थी तसेच सर्व प्रकारचे कलाकार वर्गाने या दिवशी विद्येची तसेच ज्ञान देवता सरस्वती प्रतिमेचे पूजन करावे. सकाळी ७:१५ पासून दुपारी १२.१५ पर्यंत सरस्वती पूजनाचा मुहूर्त आहे.
पूजेसाठी लागणारी सामग्री
देवी सरस्वती प्रतिमा, हळद, कुंकू, अक्षता, पांढरी शेवंती फुले, पांढऱ्या फुलांचा हार, पाच प्रकारची फळे
पूजाविधी
यथासांग पूजेनंतर सरस्वती मंत्र पठणाला विशेष महत्त्व आहे.
ओम रिम सरस्वतये नमः या मंत्राचे १०८ वेळा पठण करावे. शेवटी गणपतीची तसेच जय माता सरस्वती माता सद्गुण वैभव शालिनी त्रिभुवन विख्याता (चाल ओम जय जगदीश हरे) ही सरस्वती ची आरती करून नैवेद्य दाखवावा.
विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील या दिवशी केले जाते.
