मुंबई – शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने पुन्हा समन्स बजावले आहे. त्यानुसार येत्या ११ जानेवारीला पुन्हा चौकशीसाठी राऊत यांनी उपस्थित रहावे, असे सांगण्यात आले आहे. यापूर्वीही राऊत या चौकशीला उपस्थित झाल्या होत्या. त्यावेळी त्यांची ३ ते ४ तास चौकशी चालली होती. पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. पीएमसी बँकेतून झालेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकरणाची ही चौकशी आहे.