शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वर्षभरात बदलले रियाचे आयुष्य; लवकरच मोठ्या पडद्यावर

by Gautam Sancheti
जानेवारी 3, 2021 | 8:19 am
in मनोरंजन
0
Eqj6k2mU0AA2pwo

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणात संशयाच्या घेऱ्यात असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचे आयुष्य एका वर्षात पूर्णपणे बदलले आहे. अर्थात दिग्दर्शक रुमी जाफरीने रिया लवकरच पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

मात्र रिया कोणत्या चित्रपटाद्वारे कम बॅक करेल, हे रुमीने स्पष्ट केलेले नाही. स्वतःच्या चित्रपटातून रियाला पुढे आणणार की आणखी कोण्या दिग्दर्शकासोबत रियाची बोलणी सुरू आहे, हे कळू शकलेले नाही. एका मुलाखतीदरम्यान रुमीने काही बाबी पुढे आणल्या. सुशांत आणि रियाच्या अत्यंत जवळच्या मित्रांपैकी एक म्हणजे रुमी जाफरी. काही दिवसांपूर्वीच रुमीने रियाची भेट घेऊन तिचे सांत्वन केले आणि लवकरच तिचे पुनरागमन होईल, असा दिलासाही दिला. एवढेच नव्हे तर चित्रपटसृष्टीने तिचे खुल्या दिलाने स्वागत करेल, असा विश्वासही रुमीने व्यक्त केला. रुमी म्हणतात की, ‘रिया हल्ली फार शांत झालेली आहे. फारच कमी बोलते. ज्या परिस्थितीतून तिला जावे लागले त्यात तिचा काहीही दोष नव्हता. वातावरण शांत झाल्यानंतर रिया अनेक गोष्टींचा खुलासा करेल,’ असेही रुमी म्हणाले.

EqoSsVkXMAAT1Z6

ते म्हणाले, ‘हे वर्ष रियासाठी अत्यंत कठीण गेले. अर्थात हे वर्ष सर्वांसाठीच वाईट होते मात्र रियासाठी जरा जास्तच वाईट ठरले. एका मध्यमवर्गिय कुटुंबातील तरुणी अख्खा एक महिना कारागृहात घालवते तेव्हा तिच्या मनावर काय परिणाम झाला असेल, याचा आपण विचारही करू शकत नाही. या घटनेने तिचे मनोबल पूर्णपणे खचले आहे. मात्र तरीही रिया या वर्षी लवकरच पडद्यावर परत येईल.’ मुख्य म्हणजे रियाचा एक चित्रपट बनून तयार आहे, मात्र तो प्रदर्शित झालेला नाही. रुमी जाफरीच्याच ‘चेहरे’ या चित्रपटात रियाची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट कोरोनामुळे प्रदर्शित होऊ शकलेला नव्हता. मात्र आता आता निर्माते एक पाऊल मागे गेले आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी आणि क्रिस्टल डिसोझासारखे दिग्गज कलावंत असले तरीही रियाची भूमिका असल्यामुळे वाद होईल, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

व्हेरीकोस व्हेन्स कशामुळे होतात?

Next Post

..हा तर ऑस्ट्रेलियाचा कुटील डाव; BCCI पण लागले कामाला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
EqTKCI1VgAM7zsb

..हा तर ऑस्ट्रेलियाचा कुटील डाव; BCCI पण लागले कामाला

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
Pharmacy

एसएमबीटी फार्मसीच्या ७२ जणांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड; लाखोच्या पॅकेजवर भरती

ऑगस्ट 7, 2025
क्रीडा व युवक कल्याण विभाग आढावा बैठक 1 1 scaled 1

नव्या खात्याची नवी जबाबदारी….क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी पदभार घेताच दिले हे निर्देश

ऑगस्ट 7, 2025
Screenshot 20250807 190254 Facebook

केंद्रीय अर्थमंत्री व वाणिज्यमंत्री यांची नाशिकच्या तिन्ही खासदारांनी घेतली भेट…कांदा प्रश्नांकडे वेधले लक्ष

ऑगस्ट 7, 2025
RUPALI

खेवलकर यांच्या हिडन फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ, १४९७ नग्न फोटो…रुपाली चाकणकर यांची खळबळजनक माहिती

ऑगस्ट 7, 2025
IMG 20250807 WA0307 2

या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा सर्वोत्कृष्ट तर ही नाट्यकृती द्वितीय

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011