नवी दिल्ली – एकदम ब्रॅण्डेड मोबाइलसाठी ओळखल्या जाणाऱ्या वन प्लसने आता आपले स्मार्ट वॉचही बाजारात आणले आहे. वन प्लस ९ सिरीजच्या लाँचिंगदरम्यानच त्यांनी वन प्लस वॉचही लाँच केले आहे. या स्मार्ट वॉचच्या माध्यमातून त्यांनी आता वेअरेबल सेगमेंटमध्ये देखील पाऊल टाकले आहे. या स्मार्ट वॉचची सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे, हे वॉच टीव्हीला कनेक्ट होऊ शकतं. आणि याच्या सहाय्याने आपण टीव्हीचा आवाज कमी जास्त करू शकतो.
भारतात हे घड्याळ १६ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे. भारतीय वेबसाईटवर मात्र याची किंमत १४ हजार ९९९ रुपये दाखवली जात आहे. काळ्या आणि पांढऱ्या अशा दोन रंगात हे घड्याळ उपलब्ध आहे. गोल डायल असलेल्या या घड्याळाच्या साईड पॅनलवर दोन बटणे आहेत.









