रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वन अधिकारी/कर्मचारी हुतात्मा झाल्यास सानुग्रह अनुदान

by India Darpan
सप्टेंबर 12, 2020 | 1:55 am
in राज्य
0
unnamed 5

यवतमाळ – वन विभागातील फ्रंटलाइन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष वन्यजीव व वन संरक्षण करताना हौतात्म्य आल्यास सानुग्रह अनुदान देण्याबाबतची योजना लवकरच मंत्रिमंडळासमोर आणणार असून प्रत्येक जिल्ह्यात वन हुतात्मा स्मारक उभारणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यवतमाळ येथे आज राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

राठोड म्हणाले की,आपला समाज हा पूर्वीपासूनच निसर्गपूजक म्हणून ओळखला जातो. जंगले वाढली तरच मानवाचा या धरतीवर टिकाव लागेल. जंगलांचे महत्त्व संतांनीसुद्धा वर्णिले आहे. ११ सप्टेंबर १७३८ रोजी, स्थानिक राजाने दिलेल्या वृक्षतोडीच्या अयोग्य आदेशाविरूद्ध, राजस्थान येथील बिष्णोई समाजाच्या ३६३ व्यक्तींनी आपले बलिदान दिले होते. राज्यात सुद्धा अनेक वन अधिकारी व कर्मचारी यांनी वन्यजीव व वने यांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. वन्यजीव व वन संरक्षणासाठी वन अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेले बलिदान हे नक्कीच प्रेरणादायी व स्फूर्तिदायक आहे. त्यांच्या या अतुलनीय बलिदानाच्या स्मरणार्थ नागपूर येथे वन हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. त्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात वन हुतात्मा स्मारक उभारण्यात येणार आहे.

वन्यजीव व वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करणे ही वन विभागाची प्राथमिकता आहे. त्या अनुषंगाने राज्यात वन अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत आपण वन्यजीव व वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करत आहोत. आजही वन्यजीव यांची शिकार आणि नैसर्गिक संसाधनांची तोड व चोरटी वाहतूक रोखण्यासाठी अनेक वनाधिकारी आणि वन कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. बऱ्याच वेळा असे संरक्षण करत असताना अशा अधिकारी व कर्मचारी, विशेषतः फ्रंटलाईन अधिकारी व कर्मचारी जसे वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वन रक्षक, वाहनचालक यांच्यावर प्राणघातक हल्ले होत असतात. अशा हल्यात बऱ्याच वेळा त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते. अशी दुर्दैवी घटना घडल्यास अशा अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबियांसाठी सानुग्रह अनुदान देण्याची योजना लवकरच मंत्रिमंडळासमोर आणणार असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही-मुख्यमंत्री

Next Post

हॉटेल्स, रिसॉर्ट सुरू होणार, पण हे बंधनकारक

India Darpan

Next Post

हॉटेल्स, रिसॉर्ट सुरू होणार, पण हे बंधनकारक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
Untitled 73

या जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट; राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

जून 22, 2025
modi 111

इराणच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान मोदी यांनी केला फोन….झाली ही चर्चा

जून 22, 2025
bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011