मंगळवार, नोव्हेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

वनाधिपती विनायक दादा पाटील यांचे निधन; आधारस्तंभ गेला

ऑक्टोबर 24, 2020 | 1:11 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20201024 WA0000

नाशिक – केवळ नाशिकच नाही तर राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक आणि अन्य अनेक क्षेत्रांचे आधारवड असलेले माजी मंत्री वनाधिपती विनायक दादा पाटील (वय ८०) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.  कोरोना संसर्गामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईत उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. ते नाशिकला परतले. काही दिवसांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर डायलेसिसचे उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यातच त्यांचे निधन झाले.

कुंदलवाडी गावातील ग्रामपंचायतीपासून त्यांच्या राजकीय जीवनप्रवासाला सुरुवात झाली. शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. वनमंत्री, सांस्कृतिक मंत्री पदही त्यांनी साभाळले. साहित्यापासून अनेक क्षेत्रात त्यांचा वावर होता. नाशिकमध्ये कुणीही मोठी व्यक्ती आली तरी ती त्यांना भेटत असे. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनीच त्यांना वनाधिपती ही पदवी दिली होती. त्यामुळे ते वनाधिपती म्हणून ओळखले जाऊ लागले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, मराठा विद्या प्रसारक अशा बहुविध संस्था-संघटनांशी ते जोडले गेले होते. त्यांच्या निधनाने नाशिकचे मोठे नुकसान झाले असून सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली

मुंबई – सरपंच ते राज्याचे मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले कृषी, वनशेती, सहकार क्षेत्रात आपला दूरदृष्टीचा ठसा उमटविणारे राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व  गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, विनायकदादा यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना कामाचा डोंगर उभा केला. शेतकरी कुटुंबातील विनायकदादा यांनी कुंदेवाडीचे सरपंच ते राज्याच्या मंत्रिमंडळात वेगवेगळी खाती सांभाळताना आपल्या कामाचा ठसा उमटविला. नाशिक जिल्ह्यात सहकार संस्थांचे जाळे तयार केले. वनशेती हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. वनशेती महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रयोग केले. अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक अशा त्यांच्या या प्रयोगाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली. त्यासाठी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. कृषी, सहकार क्षेत्रात काम करणारे प्रयोगशील आणि ज्येष्ठ नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे मार्गदर्शक म्हणून पाहिले जात होते. राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी निरपेक्षपणे काम करणारे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आदराचे स्थान असलेले नेतृत्व आपण विनायकदादांच्या निधनामुळे गमावले आहे.

…….

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना श्रद्धांजली
मुंबई – देशातील सहकारी वनशेतीचे जनक अशी ओळख असलेले राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निधनानं शेती, वनशेती, पर्यावरण, सहकार, उद्योग, राजकारण, समाजकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणारं, कर्तृत्वं गाजवणारं, दूरदृष्टीचं नेतृत्वं हरपलं आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व कवीवर्य कुसुमाग्रजांचा आशिर्वाद लाभलेल्या ‘वनाधिपती’ विनायकदादांचं निधन ही राज्यासाठी मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, विनायकदादांनी गावच्या सरपंचपदापासून राज्याच्या मंत्रिपदापर्यंत प्रवास केला. हा प्रवास एकमार्गी नव्हता, राजकीय प्रवासाच्या बरोबरीनं समाजकारण, सहकार, कृषीविकासाच्या माध्यमातूनही सामान्य जनतेची सेवा केली.  शेती आणि वनशेतीच्या क्षेत्रात अनेक प्रयोग केले. त्याचा राज्याला मोठा उपयोग झाला. वनशेतीच्या संदर्भातील त्यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला. वनशेतीच्या संदर्भातील त्यांचे विचार पुढं घेऊन जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

…….

जेष्ठ मार्गदर्शक असलेले नाशिकचे दादा हरपले- पालकमंत्री छगन भुजबळ

देशात वनशेती, पर्यावरण, सहकार, उद्योग, राजकारण, समाजकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले असून एक आदराचे स्थान असलेले ज्येष्ठ मार्गदर्शक कायमचे हरपले असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. पाटील यांच्या निधनानंतर नाशिक येथील त्यांच्या कदंबवन या निवासस्थानी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर अंत्ययात्रेत सहभागी होऊन नाशिकच्या द्वारका पंचवटी अमरधाम येथे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व कवीवर्य कुसुमाग्रज यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभला. तसेच शरदचंद्र पवार साहेब यांच्यासोबत त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम केलं.पवार साहेबांचे ते जीवाचे मित्र होते.नाशिकमध्ये सर्व पक्षांचे नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असत.वनशेती हा त्यांचा अत्यंत आवडीचा आणि अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे भारतातील सहकारी वनशेतीचे ते जनक ठरले. वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा या वनस्पतीची मोठ्या प्रमाणावर तंत्रशुद्ध शेती त्यांनी १९८६ मध्ये केली होती. या वनस्पतीपासून प्रायोगिक तत्वावर डिझेल निर्मिती करून त्यांनी तेव्हा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. विनायकदादा पाटील यांना वनशेतीतील योगदानासाठी महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण आणि वनश्री तर भारत सरकारचा इंदिरा प्रियदर्शनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. फुड अँड अॅग्रीकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्सचा आऊटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया तसेच जीनिव्हा येथील रोलेक्स अवॉर्डही त्यांनी पटकावला होता. हे पुरस्कार मिळवणारे ते पहिले व एकमेव भारतीय होते.यासह विविध पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते.

ते म्हणाले की, विनायकदादा पाटील यांचा प्रवास थक्क करणारा होता. निफाड तालुक्यात कुंदेवाडीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणात श्रीगणेशा केला. त्यानंतर निफाड तालुका पंचायत समिती सभापती, निफाडचे आमदार, विधान परिषद सदस्य अशी भरारी घेत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात उद्योग, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व युवकसेवा अशा विविध खात्यांच्या मंत्रिपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. सहकार क्षेत्रातही त्यांचा दबदबा राहिला. सहकारी सोसायटीचे चेअरमन, नाशिक जिल्हा सहकारी भूविकास बँकेचे अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राज्यमंत्रिपदाच्या दर्जासह त्यांनी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले.

त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या आणि आदराचे स्थान असलेल्या दादांना आपण कायमचे मुकलो आहोत. विनायकदादांच्या निधनाने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून राज्यशासनाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो असो छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

….

बळ देणारे वडीलधारी माणूस होते.

साहित्य,कला,समाजकारण,कृषी क्षेत्रात रमणारे विनायकदादा सर्वांचेच मित्र होते,आस्थेने , आपूलकीने जिव्हाळ्याने मैत्री जोपासणारे दिलखुलास व्यक्तीमत्व होते,समाजातील अनेक प्रश्नांची त्यांना जाण असल्याने ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले . विचारांना वस्तुनिष्ठ पणा असल्याने त्यातून दिशादर्शकता होती, या त्यांच्या  गुणांचा, लाभ मला झाला. ते उत्तम मार्गदर्शक होते,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र नाशिक च्या संस्थेत त्यांच्यासोबत काम करण्याचा मला योग आला. आधुनिक विचारांची  जाणिव असलेले दादा उत्तम मित्र म्हणून सोबत करत. माझ्या.सहकार,सांस्कृतिक ,अशा विविध क्षेत्रातील वाटचालीत ते माझ्यासाठी कायम पाठीवर थाप देणारे ,बळ देणारे वडीलधारी माणूस होते.एक समृद्ध आयुष्य जगलेल्या व्यक्तीचा सहवास मला मिळाला हे मी भाग्य समजतो. विनायकदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
विश्वास जयदेव ठाकूर
कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र नाशिक

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आजचे राशीभविष्य – शनिवार – २४ ऑक्टोबर २०२०

Next Post

 जिल्हा बँकेचे अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष  केदा आहेर यांना मातृशोक

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या ११ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 10, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

दारू पाजून तरुणीवर बलात्कार… अश्लील फोटो व्हायरल करण्याचीही धमकी… मित्रासमवेत शरीरसंबंधांची बळजबरी…

नोव्हेंबर 10, 2025
crime1 1
महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणावर थेट तलवारीने सपासप वार… नाशकातील घटना…

नोव्हेंबर 10, 2025
Audi Q3 Signature Line
महत्त्वाच्या बातम्या

भारतात लॉन्च झाल्या ऑडीच्या या लक्झुरीअस कार…

नोव्हेंबर 10, 2025
thandi
मुख्य बातमी

थंडीच्या लाटेबाबत असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 10, 2025
bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
Next Post
IMG 20201024 WA0003

 जिल्हा बँकेचे अध्यक्ष, भाजप जिल्हाध्यक्ष  केदा आहेर यांना मातृशोक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011