वणी – केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत सुरू असलेल्या मका खरेदी विक्री केंद्राचे खा.डॉ.भारती पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.मका उत्पादक शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळावा या हेतूने केंद्र सरकारने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ठीकठिकाणी मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहे. त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन खा.डॉ.भारती पवार यांनी कार्यक्रमा प्रसंगी केले.