दिंडोरी – तालुक्यातील वणी येथील कळवण-सापुतारा त्रिफुलीवर दूध वाहतूक करणाऱ्या वाहनाने पादचाऱ्यास धडक दिल्याने पादचारी जागीच ठार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी येथील बिरसा मुंडा चौकाजवळ दूध वाहतूक करणारा टेम्पो (क्र. एमएच १७ एजी ५००) हा वणीकडून सापुताराकडे जात होता. त्याचवेळी चौकाकडून विश्रामबाग पाडा, वणी येथे घराकडे पायी जात असलेले वामन राघव धुम (वय ६२) या पादचारी ज्येष्ठ नागरिकास जोरदार धडक दिली. टेम्पोचे चाक चेहऱ्यावरुन गेल्याने धुम गंभीर जखमी झाले. त्यांना येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर मोरे यांनी घोषित केले. याबाबत वाहनचालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nice