बुलंदशहर (उत्तर प्रदेश) – फटाके विकणाऱ्या एका तरुणाला बुलंदशहर पोलिसांनी फारच वाईटरित्या फटकावले. एवढेच नव्हे, तर त्याला खेचत पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मात्र, आपल्या वडिलांना पोलिसांनी घेऊन जाऊ नये, म्हणून त्याच्या मुलीने पोलिसांना विनंती केली, गाडीवर डोकेही आपटले, पण तरीही पोलिसांना काही तिची दया आली नाही.
हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तरुणाला सोडून देण्याचे आदेश दिले. हे प्रकरण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत पोचले. आणि त्यांनी लगेचच अधिकाऱ्यांना मिठाई घेऊन त्याच्या घरी जाण्यास सांगितले. तसेच या प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई देखील करण्यात आली. अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे मीडिया सल्लागार शलभमणी त्रिपाठी यांनी ट्विटरद्वारे दिली.