नाशिक – महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या इंदिरानगर शाखाक्षेत्रातील वडा ळा भागात गुरुवारी महावितरणच्या पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये तीन औद्योगिक कारखाने व एक गोठा येथे अनधिकृतपणे केबल टाकून वीज चोरी करीत असल्याचे उघडकीस आले असून त्यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.
महावितरणच्या नाशिक परिमंडळातील नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या इंदिरानगर शाखाक्षेत्रातील वडा ळा भागात आज गुरुवारी महावितरणच्या पथकाने टाकलेल्या धाडीमध्ये तीन औद्योगिक कारखाने व एक गोठा येथे अनधिकृतपणे केबल टाकून वीज चोरी करीत असल्याचे उघडकीस आले असून त्यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक परिमंडळच्या मुख्य अभियंता रंजना पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता प्रविण दरोली व नाशिक शहर विभाग २ चे कार्यकारी अभियंता माणिकलाल तपासे यांच्या नेतृत्वाखाली वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी आज २१ जानेवारी रोजी वीज चोरीविरोधी मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत सहा अतिरिक्त कार्यकारी अभियंता, एक उपकार्यकारी अभियंता, चौदा सहाय्यक अभियंता , लेखा विभागातील ७ कर्मचारी , मानव संसाधन विभागातील ७ कर्मचारी तसेच १८ जनमित्र यांचा समावेश होता. यांची एकूण ७ वेगवेगळे पथके तयार करून या पथकांनी एकाच वेळी ७ विविध ठिकाणी आकस्मिक छापे मारले. त्यामध्ये नाशिक येथील वडाळा व विल्होळी येथील औद्योगीक वीज जोडणी यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वडाळा या ठिकाणी एकूण ४ वीजचोऱ्या उघडकीस आल्या यामध्ये तीन औद्योगिक व एक गोठा येथे असलेली वीज चोरी उघडकीस आली. वीज चोरीचे एकूण युनिट्सची व वीजचोरीचे बिल प्रणाली मध्ये तयार करण्याची प्रकिया सुरु आहे. नाशिक विभागात वीज चोरी व वीजगळती या वर लक्ष केंद्रित करून पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वीजचोरी व विजेचा अनधिकृत वापर टाळावा असे आवाहन महावितरणने केले आहे.