राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चाचणी
नाशिक- मिशन झीरो नाशिक अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली वडाळा गाव, सातपूर कॉलनी व बॉइज टाऊन शाळा परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून रॅपिड अॅण्टिजेन टेस्ट केली. यावेळी वडाळा गावातील राजवाडा परिसरात झालेल्या रॅपिड अॅण्टिजेन टेस्टमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आढळल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
कोरोना विषाणूला रोखून कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी नाशिक शहरातील विविध भागांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आरोग्य तपासणी व रॅपिड अॅण्टिजेन टेस्ट मोहीम सुरू केली आहे. याचा एक भाग वडाळा गावातील राजवाडा परिसर, सातपूर कॉलनीमधील दक्षिणेश्वर हनुमान मंदिर परिसर व बॉइज टाऊन शाळा परिसर येथील नागरिकांची तापमान चाचणी व पल्स ऑक्सिजन चाचणी करून रॅपिड अॅण्टिजेन टेस्ट घेण्यात आली. राजवाडा परिसरातील शंभर नागरिकांची रॅपीड अॅण्टिजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून न आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. तर सातपूर कॉलनीमध्ये १०३ पैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, जय कोतवाल, जीवन रायते, बाळासाहेब जाधव, आसिफ शेख, डॉ. संदीप चव्हाण, नीलेश भंदुरे, शरीफ शेख, बाळा निगळ, विकास सोनावणे, ॲड. अजिंक्य गिते, विनोद येवलेकर, ॲड. महेश गायकवाड, संदीप चावला, नीलेश साळवे, यश खरात, संजय साळवे,अमोल पवार, महेश साळवे, ललित साळवे, चंद्रकांत पगारे, लोकेश कटारिया, ऋषि खरोटे, राजेश भावसार, बाळासाहेब पाटील, ईश्वर घाटोळ, शरद संगले, रोहित शिरोडे, सागर पाटोले, अमन शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.