नाशिक – सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सतीमाता – सामतदादा मंदिरातून शनिवारी रात्री चोरट्यांनी चांदीच्या पादुका व मूर्तीच्या कानातील दागिन्यांची चोरी केली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. विश्वस्त अशोक चव्हाण यांनी मुसळगाव पोलिसात तक्रार दिली.
दरम्यान, ऑक्टोबर २०१३ मध्येही या मंदिरातून पादुकांची चोरी झाली होती. त्याचाही तपास अद्याप लागलेला नाही. त्यातच आता पुन्हा चांदीच्या पादुका चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.