चांदवड -वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत आयशर गाडीमध्ये असलेले विदेशी मद्याचे २०६ बॉक्ससह एकूण १२ लाख ५६ हजार २३७ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गणेश चंद्रकांत गुरव यांना मुंबई आग्रा हायवेवर एक अवैध दारूची आयशर गाडी जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी साफळा रचुन या गाडीला पकडले. एमएच ०४ – ईएल – ४३२१ या गाडीत अवैध विदेशी मद्य नेण्यात येत होते. या प्रकरणी चालक किसनसिंग नथुसिंग चव्हाण (वय- २७ रा.धोलकपुरा ता.रायपुर जि. पाली राजस्थान) महेंद्रसिंग भैरवसिंग चव्हाण ( वय-२५ रा.नाडा ता. ब्यावर, जि. अजमेर, राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कार्यवाहीत सहायक पोलिस निरीक्षक गुरव, पाटील, इंद्रेकर, आहिरे, पोलीस हवालदार कृष्णा भोये, मच्छिद्र कराड, संतोष वाघ यांनी कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे.