नाशिक – नववर्ष स्वागत समिती, नाशिक आणि ‘वंदे मातरम् संयोजन समिती, नाशिक आयोजित “वंदे मातरम् २०२१ टी-शर्ट’ चा अनावरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जानेवारी 2020 मध्ये “वंद्य वंदे मातरम्” हा 10,000 नागरिकांचा सहभाग असलेला सामूहिक ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीत गायनाचा अभिनव उपक्रम नाशिकमध्ये यशस्वीरित्या पार पडला आहे. त्यानंतर आता आगामी २०२१ करिता २५ जानेवारी २०२१ रोजी डिजिटल माध्यमातून होणाऱ्या “वंद्य वंदे मातरम्” या अतिभव्य सोहळ्यासाठी “वंदे मातरम् २०२१ टी-शर्ट” चा अनावरण सोहळा शनिवारी सायंकाळी ५ वाजता, कुर्तकोटी सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सदर सोहळ्यास प्रशांत बाग यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अविनाश आव्हाड यांनी स्वागत परिचय दिला, डॉ. मुकेशजी अग्रवाल यांनी कार्यक्रमाची माहिती दिली व प्रास्ताविक सुधिर मुतालीक यांनी केले, तर सुत्र संचालन सुयोग शहा यांनी व आभार प्रदर्शन कौस्तुभ मेहता यांनी केले. यावेळी समितीचे प्रफुल्ल संचेती, रामेश्वर मालानी, अजय निकम, अॅडव्हॉकेट सुयोग शहा यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.