हैदराबाद – भोळ्याभाबड्या व गोरगरिब लोकांचे पैसे लुबाडण्यासाठी भामटे काहीही करू शकतात. तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला. मुद्दाम रस्ता अपघात घडवून लोकांची हत्या करून त्यांचे विम्याचे पैसे लाटणाऱ्या टोळीला पोलीसांनी अटक केली. या टोळीतील लुटारू हे लोकांचा मुद्दाम बळी घेतल्यानंतर जीवन विम्याची खोटी कागदपत्रे दाखवून रक्कम हडप करत होते. या प्रकरणी फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या टोळीतील लोक हे एखाद्या व्यक्तीला खुनासाठी जोरदार मारहाण करीत असत, त्यानंतर त्या पिडीताचा मृत्यू झाल्यावर त्यांना विविध वाहनांकडून मृतदेह चिरडण्यात येत असत. त्यानंतर मृतांच्या कुटुंबीय व इतरांच्या सहकार्याने विविध विमा कंपन्यांसमोर कोट्यावधी रुपयांचा दावा केला जात असे.
मुख्य आरोपी यापूर्वी एका वित्तीय कंपनीत काम करत होता. त्याने २०१७ पासून इतर पाच आरोपींसह अशा पाच प्रकरणांमध्ये बनावट काम करण्याचा कट रचला. अशा चार घटनांमध्ये लोक ठार झालेल्या व्यक्तींचा नैसर्गिक मृत्यूचा अपघात म्हणून विम्याच्या रकमेचा दावा केला.
विशेष म्हणजे फसवणूक करणारे लुटारू हे आजारी व मद्यपी लोकांना आपले लक्ष्य करीत असत आणि त्यांच्या कुटुंबियांना थोडी रक्कम देऊन मुदत विमा पॉलिसी खरेदी करण्यास भाग पाडत असत. मग पॉलिसीधारकाची हत्या केल्यानंतर आरोपी अपघातात मृत्यू घडवत असे आणि विमा कंपनीच्या रकमेचा दावा करीत असत.
विम्याची रक्कम मिळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना व इतर लोकांनाही त्यात हिस्सा देण्यात येत होता. दरम्यान, एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली पोलीसांना मिळाली , तेव्हाच त्याचा मृत्यू रस्त्याच्या अपघातात झाल्याचे दिसून आले. मात्र अधिक तपास सुरू केला, तेव्हा वैद्यकीय व शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले की, हल्ल्यात जखमी झाल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तपासादरम्यान कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पाच जणांना अटक करण्यात आली.