लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची आज (दि. ९ ऑक्टोबर) पुण्यतिथी, त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याला दिलेला हा उजाळा…
साधारणत: १२८ वर्षांपूर्वीचा एक हृदयद्रावक प्रसंग आहे, महाराष्ट्रातील नव्हे तर अवघ्या भारतभूमीला अभिमान वाटेल अशा थोर पुरुषाचे निधन होऊन दहा बारा बारा दिवस उलटले होते. पुणे शहरात एका दुखवटा सभेचे (आजच्या भाषेत श्रद्धांजली सभेचे ) आयोजन करण्यात आले होते .या सभेला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्याच वेळी थोर समाज सुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे उभे राहिले आणि त्यांनी,
जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुले,
तोचि साधु ओळखावा,
देव तेथेची जाणावा….
हा संत तुकारामांचा अभंग म्हणावयास सुरुवात केली, हा अभंग म्हणत असताना न्यायमूर्ती रानडे यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. सभेतील सर्व उपस्थित जण रडू लागले .महाराष्ट्रातील या थोर पुरुषाच्या कार्याची महती खुद्द न्यायमूर्ती रानडे यांनी जाणली होती. कोण होते ते महापुरुष ? काळाच्या पडद्याआड गेलेले ते थोर पुरुष होते. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख…
गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुणे येथे दि. १८ फेब्रुवारी १८२३ रोजी झाला. त्यांचे वडील हरिपंत हे पेशव्यांचे पराक्रमी सेनापती पराक्रमी सेनापती हे पेशव्यांचे पराक्रमी सेनापती पराक्रमी सेनापती गोखले यांचे फडणीस होते. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर मराठी प्रातांत अस्थीरतेचे वातावरण होते. त्या काळी पारंपरिक पाठशाळा देखील होत्या. परंतु
गोपाळराव यांचे शिक्षण इंग्रजी शाळेत झाले. इंग्रजी शाळेत त्यांनी चांगली प्रगती केली. अगदी त्याकाळी बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या वार्षिक अहवालात त्यांचा उल्लेख गुड एज्युकेशन स्कॉलर म्हणून केला गेला आहे. या शाळेत गेल्यानंतर त्यांनी सर्व प्रकारच्या इंग्रजी पुस्तकांचा अभ्यास केला.
इतिहास,भूगोल, राजकारण ,कायदा या विषयामधील उच्च शिक्षणातील त्यांची गती पाहून याकाळात पुण्याचे न्यायाधीश न्यायाधीश जॉन गार्डन यांनी गोपाळरावांना सरकारी सेवेत सामावून घेतले. त्या काळातील दाक्षिण भारतातील सरदारांसाठी असलेल्या एजंट कचेरी या कार्यालयात ते दरमहा ७० रुपये पगारावर अनुवादकाचे काम करू लागले .ती नोकरी करत असताना त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या. त्यानंतर १८५५ मध्ये सातारा येथे त्यांनी त्यांना बढती मिळाली. बुद्धिमत्ता, कर्तव्य तत्परतेच्या जोरावर त्यांनी इनाम कमिशनर म्हणून काम केले. न्यायालयीन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची नेमणूक वाई येथे कोर्टात प्रथम वर्ग मुनसफ नेमणूक करण्यात आली.
दरम्यान, मुंबई सरकारने त्यांना अहमदाबाद येथे सहाय्यक न्यायाधीश म्हणून नेमले. परंतु या पदावर एका भारतीय व्यक्तीची नेमणूक करण्याची पाहिलीच वेळ असल्याने इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये थोडा वाद झाला. गोपाळराव यांना नाशिक येथे कनिष्ठ स्तर कोर्टात न्यायाधीश म्हणून काम करावे लागले. कारण सनदी आधिकारी नेमताना इंग्रज आणि भारतीय दुजाभाव त्या काळात होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी सुमारे दहा वर्ष अहमदाबाद येथे कोर्टात नोकरी केल्यानंतर १८८४ मध्ये ते रतलाम संस्थानचे दिवाण झाले.
याच दरम्यान त्यांचा मुंबई विद्यापीठाने पदवी देऊन गौरव केला. तसेच म्हणून मुंबई कौन्सिलच्या देखील ते सभासद होते. दिल्ली येथे भरलेल्या दरबारात त्यांना रायबहाद्दर हा किताब देण्यात आला. गोपाळराव यांची बुद्धिमत्ता, विद्वत्ता आणि चारित्र्य याने प्रभावित होऊन महर्षी दयानंद यांनी आर्यसमाजाच्या विश्वस्तपद त्यांची नेमणूक केली. नोकरीत असतानाच गोपाळरावांचे लेखन कार्य सुरूच होते. एकूण ४४ वर्ष त्यांनी अखंडपणे अनेक प्रकारचे लेखन केले शतपत्राच्या लेखनाचा प्रारंभ केल्यानंतर प्रभाकर साप्ताहिकातून तसेच वृत्त वैभव इंदुप्रकाश आदि नियतकालिकातून त्यांचे लेखन सुरू होते. १८४२ मध्ये त्यांना हिंदुस्थानचा इतिहास हा ग्रंथ लिहिला. तसेच सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सुरू केलेल्या लोकहितवादी या मासिकातून समाजसुधारणेची चळवळ बद्दल अनेक परखड विचार मांडले. त्यांच्या बद्दल समाजात अनेक गैरसमज निर्माण करण्यात आले, परंतु त्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपले समाजसुधारणेचे कार्य सुरूच ठेवले. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना लोकहितवादी ही पदवी देण्यात आली. अखेर वयाच्या ६९ यावर्षी दि. ९ ऑक्टोबर १८९२ या दिवशी गोपाळरावांचे देहावसान झाले .
(लेखकाशी संपर्क : मोबाईल – 9404786784 ई मेल – baviskarmukund02@gmail.com)