नवी दिल्ली – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातल्या शेवटच्या दिवशी लोकसभेत शनिवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी दहाला सत्र सुरू झालं. कोविड-१९ संकटामुळे या सत्रात राज्यसभेचं कामकाज सायंकाळी चारला सुरू होऊन रात्री नऊ वाजेपर्यंत चालत होतं. लोकसभेतील आजच्या दिवसभरातील कामकाजाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
आज १३ फेब्रुवारीला राज्यसभेमध्ये कामकाज होणार नाही. मात्र, लोकसभेत आज अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा अपेक्षित आहे. भाजपनं आपल्या खासदारांना तीन व्हीप जारी केल्या असून, शनिवारी अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊन ते मंजूर केले जाणार आहेत. लोकसभेत सर्व भाजप सदस्यांनी दहा वाजेपासून दिवसभर सभागृहात सकारात्मकरित्या उपस्थित राहून सरकारचं समर्थन करावं असं भाजपनं म्हटलं आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनचा शेवटचा दिवस
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर सांगितलं, की लोकसभेच्या सर्व सदस्यांच्या अपिलानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच लोकसभेचे कामकाज सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालले.
राज्यसभेचे शनिवारचे कामकाज रद्द करण्यात आले असून लोकसभेचे कामकाज सकाळी दहाला सुरू झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा दोन्ही सभागृहात ८ मार्च ते ८ एप्रिलपर्यंत असा राहिल.