महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन
नाशिक ः नाशिक प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले. ऑपरेशन लोटसच्या नावाखाली भाजप गलिच्छ राजकारण करीत आहे. लोकशाही वाचविण्यासाठी भाजप हटाव, असा नारा यावेळी देण्यात आला.
नाशिक शहर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी सांगितले की, जगातील सर्व जनता तसेच भारतातील सर्व नागरिक कोरोनाच्या महामारीने त्रस्त असतांना गेल्या ४ महिन्यांपासुन सत्तेसाठी गलिच्छ व कपटी राजकारण मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये भाजपा केंद्र सरकारतर्फे सुरु आहे. याआधी कर्नाटक, छत्तीसगढ, गोवा येथेसुध्दा सदर घोडेबाजाराचे गलिच्छ राजकारण भाजपाने केले होते.
काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी सांगितले की, भाजपा केंद्र सरकार कडुन सातत्याने देशात होत असलेली लोकशाहीची पायमल्ली, लोकशाही पद्धतीने निवडून आलेली सरकार अस्थिर करणे घोडेबाजार करुन सरकार पाडण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे लोकशाहीची एकप्रकारे हत्याच आहे. याच्याविरोधात नाशिक शहर युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरतीव्र निदर्शने करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारींच्या मार्फत राष्ट्रपतींकडे केंद्रातील भाजपा सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी नाशिक शहर युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली. काळ्या फिती लावुन रास्ता रोको करण्यात आला. सोशल डिस्टंसिंगचे पालन यावेळेस करण्यात आले.
, ,प्रदेश प्रवक्त्या डॉ हेमलताताई पाटील, प्रदेश सचिव नगरसेवक राहुल दिवे, युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव जि.प. सभापती अश्विनी आहेर,युवक काँग्रेस प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, युवक काँग्रेस महा. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रवक्ता दर्शन पाटील, मध्य ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, पंचवटी ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, अनु जाती अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, अण्णा मोरे, दिनेश उनवणे, सचिन दीक्षित, अनिल बहोत यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी युवक काँग्रेसचे शहरउपाध्यक्ष धनंजय कोठुळे, जयेश पोकळे, विधानसभा अध्यक्ष रोहन कातकाडे, महासचिव सलमान काझी, जावेद पठाण, चिटणीस आकाश नागर, सलमान शेख, सागर वाहुळ, चेतन विधाते आदी. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निदर्शने केली व निषेध व्यक्त केला.