राजू देसले, नाशिक
……
नव्या आणि सहजपणे उपलब्ध होणार्या करमणुकीच्या जगात आज पारंपारिक लोककलांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अल्प उत्पन्नगटातील कलाप्रकार म्हणजे लोककला आणि त्याच अनुषंगाने लोकरंगभूमीच्या अस्तित्वाचा विचार करणे आजच्या नवनव्या चॅनेल्सच्या माध्यमांच्या जमान्यात महत्त्वाचे आहे.
आजही खेड्यापाड्यात गावच्या जत्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धा व तमाशा सादरीकरणासाठी अर्धी अर्धी रक्कम खर्च केली जाते. महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या चेहर्यावर दोन वेळा हास्य फुलते ते ‘सुगीच्या दिवसात व तमाशा बघताना’ असे म्हटले जाते. गण, गवळण, बतावणी, वगनाट्य असा मनोरंजनाचा बाज असलेल्या तमाशा लोकरंगभूमीचा पारंपारिक कलेचा मानबिंदू आहे. काळू-बाळू, चंद्रकांत ढवळपुरीकर, विठाबाई नारायणगावकर, कांताबाई सातारकर, तुकाराम खेडकर, रघुवीर खेडकर अशा अनेक लोकनाट्य पथकांनी महाराष्ट्राला अभिरुचीची अस्सल मनोरंजनाची भेट दिली व समाजाचे प्रबोधनही केले आहे आणि ते महाराष्ट्राच्या लोककलेचे संचित रसिकांनी जपून ठेवले आहे.
छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी काही वर्षापूर्वी ‘तमाशा’ ह्या विषयावर छायाचित्रे काढली. महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या कलाप्रकारात काय बदल झाले ? लोकांची तमाशा कलावंतांकडे उपेक्षेने बघण्याची वृत्ती सार्वत्रिक आहे का ? याचा वेध छायाचित्रणातून घेतला. यासाठी संदेश पुणे जिल्ह्यातील छोट्या खेड्यापासून ते सातारा, सांगली, कर्हाड, मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, जालना ते थेट विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जवळपास सत्तर ते ऐंशी गावात फिरला. त्यापैकी निम्याहून अधिक गावात मातीचे रस्ते, केबल नेटवर्क नव्हते, दूरध्वनीचीही सुविधा नव्हती पण तमाशाची परंपरा होती. संदेशने तमाशातील सोंगाड्या, मावशी, सरदार अशा अनेक पात्रांशी संवाद साधला आणि ते अनुभव शब्दबद्धही केले. बंगलोरच्या ‘इंडिया फाऊंडेशन फॉर दी आर्टस्’ या संस्थेने या कामासाठी त्याला शिष्यवृत्ती दिली होती.
सर्वसामान्यांचे रोजच्या जगण्याचे, आस्थेचे प्रश्न घेऊन ते बोलीभाषेत सादर करणे हा समान धागा लोककलाकार व तमाशा बघणार्यांमध्ये असतो. त्यातूनच हे सारे आपले आहे आणि कलाकारांची अदाकारी याचा सुरेख मेळ सादरीकरणात असतो त्यामुळे तमाशासारखी कला अजूनही जिवंत आहे. ‘जांभूळ आ‘यान’ सार‘या आ‘यानाचा फॉर्म असलेले कथननाट्य. कुंती आणि द्रौपदीच्या ‘मन पाकुळलं’ या एका मनोवस्थेचे चित्रण रंगमंचावर किती प्रभावीपणे सादर होते हे अनेकांनी अनुभवले आहे. मौखिक परंपरेतून आलेल्या कथा सादरीकरणात किती जिवंतपणा लोककलाकार आणू शकतो याचा अनुभव रंगभूमीवर लक्षणीय ठरला आहे.
प्रा.रवींद्र कदम यांनी दिग्दर्शित कलेल्या ‘खंडोबाचं लगीन’ या नाटकाने लोकरंगभूमीवर असाच इतिहास घडवला आहे. सुरेश चिखले यांनी लिहिलेल्या या नाटकाची कथा तशी साधी सोपी. जेजुरी खंडेरायाच्या दुसर्या लग्नाची ही कथा. वाघ्या-मुरळी सूत्रधारांकडून जागरात खंडेरायाच्या लग्नाची कथा सांगितली जाते. जागरण विधीनाट्याचा फॉर्म असलेली ही कथा. कथनशैलीतून उलगडत जाते. कलावंतांचा सहजसुंदर अभिनय, नेपथ्य यामुळे या नाटकाने सादरीकरणाचा अनोखा अनुभव दिला. ग्रामीण ढंगातील संवाद आणि गीते, लय, अभिनयातील अस्सलपणाने नाशिकच्या रंगभूमीवर हे नाटक मैलाचा दगड ठरले. महाराष्ट्राबाहेर या नाटकाचे जोरदार कौतुक झाले.
याच शैलीचा वापर करून लोकरंगभूमीवर ‘कथा तुळशीच्या लग्नाची’ हे नाटक रवींद्र कदम यांनी दिग्दर्शित केले होते. यात कीर्तनाचा फॉर्म वापरला. तुळशीच्या लग्नाचे आ‘यान कीर्तनकार सांगतो आणि त्यातून जगण्याची, लोकजीवनाची रहस्ये उलगडत जातात अशी ही कथा. त्यातही बोलीभाषा आणि रसाळपूर्ण निरुपण यांचा प्रभावी वापर केला. डॉ.रामदास बरकले यांनीही लोकरंगभूमीसाठी प्रयोगशील जाणीवेतून दिग्दर्शन केले. त्यात ‘क्रांतीचक्र‘, आतून कीर्तन वरून तमाशा, गाढवाचं लग्न’, शेक्सपिअरच्या ‘मिडसमर नाईट’वर आधारीत नाट्यविष्कारातून लोकनाट्याचा अनोखा अविष्कार त्यांनी दिला. लोककलांच्या अंगानेही नाटकांचा विचार व्हावा हा डॉ.बरकले यांचा आग्रह असायचा त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. तसेच प्रभाकर कदम यांनीही ‘कलासंगम’ या ग्रुपमार्फत अनेक नाटके दिग्दर्शित केली. त्यात पु.ल.देशपांडे यांच्या ‘पुढारी पाहिजे’ या लोकनाट्याचा अग‘क‘माने समावेश करावा लागेल.
लोकरंगभूमीवरील घडणारे नाट्य हे अविष्काराच्या विविध पद्धतींचा शोध घेणारे असते. त्यात कलावंतांच्या सादरीकरणालाही कॅनव्हास मिळतो आणि कलावंताजवळ फक्त पारंपारिक सादरीकरणाचा संस्कार हीच त्याची शिदोरी असते.
अजूनही महाराष्ट्रात विविध भागात, खेड्यापाड्यात लोककलांचे गावपातळीवर सादरीकरण केले जाते. अनेक अष्टपैलू कलावंत लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत आहेत. त्यांना हक्काचे व व्यापक व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. त्यातूनच ही कला जिवंत राहील व त्यातून समाजाची सांस्कृतिक स्पंदने वेगाने सुरू राहतील.
अजूनही महाराष्ट्रात विविध भागात, खेड्यापाड्यात लोककलांचे गावपातळीवर सादरीकरण केले जाते. अनेक अष्टपैलू कलावंत लोककलेच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत आहेत. त्यांना हक्काचे व व्यापक व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. त्यातूनच ही कला जिवंत राहील व त्यातून समाजाची सांस्कृतिक स्पंदने वेगाने सुरू राहतील.
राजू देसले यांचा लोकरंगभूमी संदर्भातील लेख वाचला.
लोकरंगभूमीची नाशिकची परंपरा ,खंडोबाचे लग्न , आमचे गुरुवर्य प्रा.रामदास बरकले यांचे दिगदर्शन तो सर्व काळपट डोळ्यासमोर उभा राहिला. नाशिकचे साहित्यिक राजू देसले हे एक संयमित व्यक्तिमत्व असल्याने अत्यन्त सुंदर लोकरंगभूमीची धांडोळा सुंदर रितीने घेतला.
राजू देसले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. धन्यवाद.
प्रिय मित्र राजू देसले ,यांच्या अभ्यासपूर्ण चिंतनातुन शब्दबद्ध झालेले लेख वाचले.हा चिंतनातुन आलेला आजीबाईचा बटवा आहे.वाचकाला अनेक नवे संदर्भ यातून मिळतात.त्यांच्या या निर्मळ प्रवाहाने आपली तहान ंनक्किच तृप्त होईल .