नाशिक – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, पंचवटी चा विद्यार्थी सोहम महेश करंदीकर याने नेत्रदीपक यश मिळविले आहे. के.व्ही.पी.वाय परीक्षेत त्याने देशात ६५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. सी जी दिघावकर यांनी सोहमचा सत्कार करुन अभिनंदन केले.
करिअर म्हणून त्याने भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू येथे प्युअर सायन्सची निवड केली आहे. सोहमने जीईई मध्ये ९९.८१ तसेच नीटमध्ये ९९.८१ पर्सेंटाइल स्कोअर केला आहे. नॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड मध्ये सुवर्णपदक मिळवून देशातील सर्वोत्कृष्ट ३६ विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बायोओलॉजी ऑलिम्पियाड मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळाली आहे. सोहमच्या या दैदीप्यमान यशाबद्दल त्याच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
सोहमच्या या यशाबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत हिरे, समन्वयक डॉ. अपूर्व हिरे, विश्वस्त डॉ. अद्वय हिरे उपप्राचार्या डॉ.सुचेता सोनवणे, पर्यवेक्षक एस.एन..भदाणे, के एन. पाटील, डी एच निकम, के पी पवार, टी एल निकम, आर एन पाटील, डी ए पवार, आर बी भगत व शिक्षकवृंदानी हार्दिक अभिनंदन व सत्कार केला आहे.