मालेगाव- लोककवी प्रशांत मोरे यांचे बंधु व मनमाड नगरपरिषदेचे व धुळे महापालिकेचे माजी अग्निशमन अधिकारी तसेच मिलिंद फायर अकॅडेमीचे संचालक जितेंद्र (अविनाश) पंढरीनाथ मोरे (५५) यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने नाशिक येथे आकस्मिक दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मुंबई येथील माजी कामगार शिक्षण अधिकारी सिद्धार्थ मोरे यांचे लहान बंधू ,व लोककवी प्रशांत मोरे व येथील छायाचित्रकार बबलू मोरे यांचे ते थोरले बंधू होत.