ठाण्यासह, मीरा-भाईदर, नवी-मुंबई, कोल्हापूर आणि नांदेड शहरासाठी निर्णय
मुंबई ः ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. महानगपालिकेच्या
वतीनं ही माहिती देण्यात आली. या लॉकडाऊन काळात सांयकाळी ५ वाजेपर्यंत सर्व
भाजीमार्केट,बाजारपेठा आणि दुकानं रस्त्याच्या एकाबाजूला आलटूनपालटून खुली राहतील.
मिरा -भाईदर महानगरपालिका क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. महानगपालिकेच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. या लॉकडाऊन काळात सांयकाळी ५ वाजेपर्यंत सर्व भाजीमार्केट,बाजारपेठा आणि दुकानं रस्त्याच्या एकाबाजूला आलटूनपालटून खुली राहतील.
कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून ७ दिवस संपुर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्व बँकांची मुख्य कार्यालयं मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामीण भागातली उद्योग आस्थापने ५० टक्के कर्मचारी क्षमतेनं सुरु राहतील. तसंच बँक एटीएमची कामं सुरु राहतील. मात्र दूध संकलन आणि वाहतुकीसाठी वेळेची मर्यादा असणार नाही. या बाबतचा सुधारित आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, १२ जुलैपासून आज मध्यरात्रीपर्यंत लागू असलेल्या संचारबंदीची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी आज दिला. यानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये दुकानं आणि व्यापारी प्रतिष्ठानं अटींची पूर्तता करून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात सुरू राहतील, तर शनिवार आणि रविवार बाजारपेठ बंद राहील. दरम्यान, संचारबंदीमुळे मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून व्यापारी वर्गही अडचणीत आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातली संचारबंदी संपवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश तांदलापूरकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात
नवी मुंबईत ४२ कोरोना हॉटस्पॉट असलेल्या विभागांमध्ये ३१ जुलैपर्यंत टाळेबंदी सुरू राहणार आहे. तर, इतर विभागांमध्ये ताळेबंदीत शिथिलता आणली आहे. या विभागांमध्ये मिशन बिगीन अंतर्गत सम, विषम तारखेनुसार व्यवहार सुरळीत होणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.