मनमाड – लॉकडाऊनच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरली असून आज (१२ ऑगस्ट) एसटी बस स्थानकाच्या मैदानात डफली बजाओ आंदोलन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी मंडल अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले.
देशात २२ मार्च पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका हा गोरगरीब, छोटे दुकानदार,व्यावसायिक, हातावरचे असलेल्या सोबत सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉक डाऊन पूर्णपणे उठवून बाजारपेठ, वाहतूक सर्व पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे डफली बाजाव आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कादिर शेख, यशवंत बागुल, अनिल शिंदे, कैलास सोपे, फरीद सय्यद, कुमार पाटील, बप्पी त्रिभुवन, रोहित सोनवणे, वैशाली पवार, अशोक जगताप, संतोष भोसले, शेख बशीर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.