मुंबई – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात पोलिसांच्या १०० या हेल्पलाईनवर १ लाख ९ हजार ६२ जणांनी संपर्क साधून मदत घेतली आहे. २२ मार्च ते १ ऑगस्ट या काळात कलम १८८ नुसार राज्यात २ लाख १९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३२ हजार ४६७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच १८ कोटी २४ लाख ४६ हजार १०४ रु. दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ८२ हजार ५५५ ई पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत. लॉकडाऊन काळात पोलिसांवर ३२४ हल्ले झाले असून याप्रकरणी एकूण ८८३ व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.