नाशिक – लष्कर दिनाच्या दिवशी लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीधर भुयान यांनी लष्कराला अनोखी भेट दिली आहे. योगा शिक्षक आणि मॅरेथॉन रनर असलेल्या भुयान यांनी शुक्रवारी (१५ जानेवारी) मोठे ५ विश्वविक्रम केले आहेत. डोके जमिनीवर ठेवून (शीर्षासन) केवळ पायांची सलग हालचाल करण्याची अनोखी कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांनी एकूण ५ विक्रम केले आहेत. भुयान हे मूळचे ओडिसाचे आहेत. त्यांचे वय सध्या ४८ वर्षे आहे. नाशिकरोड येथील आर्टिलरी सेंटरमध्ये त्यांनी हा विक्रम केला आहे.
त्यांचे ५ विक्रम असे
१. पन्नाशीच्या जवळ वय अससेल्या भारतीय व्यक्तीने प्रथमच शीर्षासनात पायांच्या तब्बल ४ हजार हालचाली केल्या.
२. २० टक्के अपंगत्व असताना सलग ४५०० शीर्षासनाचे दुसरे रेकॉर्ड केले (कोका कोला रेकॉर्ड)
३. ५ हजार शिर्षासनाचे तिसरे रेकॉर्ड केले (लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड)
४. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसचे शिर्षासनाचे ५५०० रेकॉर्ड
५. तब्बल १३ हजार ७२५ शीर्षासनाचे गिनेस बुक वर्ल्ड रेकॉर्ड
बघा व्हिडिओ