मुंबई – गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल व माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ई- मेल केलेल्या लेटरमध्ये नेमकं काय आहे ? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. या पत्रात परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयाचा फंड गोळा करण्याचे लक्षाबरोबरच अनेक गोष्टीं सविस्तरपणे लिहिल्या आहे. त्यामुळे हे पत्र सध्या तरी चर्चेत आहे. या पत्रात मुंबई पोलीस आयुक्त म्हणून काम करताना मला असा अनुभव आला आहे की गृहमंत्री माझ्या काही अधिकाऱ्यांना परस्पर बैठकीसाठी बोलवतात आणि त्यांना फंड गोळा करण्याचे निर्देश देतात. ही गोष्ट अवैध आणि घटनेला अनुसरुन नाही. या सर्व बैठकींची कल्पना मला माझे अधिकारी द्यायचे. गृहमंत्री पोलिसांच्या कारभारात प्रचंड ढवळाढवळ करत. हा असला राजकीय हस्तक्षेप घटनेला बाधा आणणारा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाविरुद्ध आहे. आयुक्त म्हणून मी पूर्ण जबाबदारी घेतोय पण पोलीस व्यवस्थेतील या हस्तक्षेपामुळे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत. याची जबाबदारी त्या चुकीच्या व्यक्तींकडे जाते असे गंभीर आरोपही केले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुखांनी १८ मार्चला लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझ्याकडून आणि माझ्या कार्यालयाकडून अॅन्टिलिया तपास प्रकरणात काही गंभीर चुका झाल्या आणि त्या अक्षम्य अशा होत्या. त्यामुळे माझी बदली करण्यात आली आणि ही बदली केवळ प्रशासकीय बदली नव्हती असेही सांगितले ते सुध्दा या पत्रात नमुद करण्यात आले आहे. या मुलाखतीनंतरच परमबीर सिंग यांनी पत्र लिहून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट होते..
या पत्राच्या सुरुवातीला मुकेश अंबानीच्या घरासमोर स्पोटके सापडल्याच्या प्रकरणी २५ फेब्रुवारीला ग्रामदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे नमुद केले आहे. त्यात त्यांनी केलेल्या कामाचा उल्लेख केला आहे, या प्रकरणाचा तपास NIA आणि ATS कडे होता. या तपासासाठी माझ्याकडून आणि माझ्या कार्यालयाकडून NIA आणि ATS ला जे काही सहाय्य गरजेचे होते ते वेळोवेळी करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येथे त्यांनी आपली जबाबदारी या प्रकरणात कशी पार पडली हे सांगितले आहे. त्याचप्रमाणे अॅन्टिलिया प्रकरणाच्या संबधित मार्च महिन्याच्या मध्यात ‘वर्षा’ बंगल्यावरील एका बैठकीत मी आपल्याला या प्रकरणात गृहमंत्र्यांनी केलेल्या काही चुका आणि गैरव्यवहारासंबंधी माहिती दिल्याचेही म्हटले आहे. त्याचप्रमाणे तशीच कल्पना मी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांनासुद्धा दिली होती. त्या वेळेस मला असे लक्षात आले की काही मंत्र्यांना मी सांगत असलेल्या गोष्टींची आधीच कल्पना होती. त्यामुळे हे प्रकरण आता सर्वांना मी अगोदरच सांगितल्याचे त्यांनी पत्रातून स्पष्ट केले आहे.
पोलीस अधिकारी सचिन वाझे जे क्राईम इंटेलिजन्स युनिट, मुंबई सांभाळत होते, त्यांना गृहमंत्री अनिल देशमुख बऱ्याचदा त्यांच्या निवासस्थानी बोलवत आणि नेहमी फंड गोळा करण्यासाठी सूचना देत असल्याचा गंभीर आरोपही त्यात केला आहे. त्याबरोबरच फेब्रुवारीच्या महिन्यात आणि त्यानंतर, गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावले होते. त्यावेळी त्यांचे स्वीय सहाय्यक पलांडे आणि इतर दोन कर्मचारी होते. त्या वेळेस गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना सांगितले की, त्यांनी दर महिन्याला १०० कोटी रुपयाचा फंड गोळा करण्याचे लक्ष आहे. ते लक्ष्य साध्य करण्यासाठी गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना सांगितले की मुंबईत साधारण १७५० बार, हॉटेल्स आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी दोन ते तीन लाख जमवले जाऊ शकतात. अशा पद्धतीने त्यांच्याकडून ४०-५० कोटी रुपये जमा केले जाऊ शकतात आणि बाकी रक्कम इतर माध्यमातून जमा केली जाऊ शकते.हा गंभीर आरोप केला आहे.
या आरोपावर ते थांबले नाही तर त्यांनी सचिन वाझे त्याच दिवशी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला या संबंधीची माहिती दिली. त्यावेळी मला धक्का बसला, आता ही परिस्थिती कशी हाताळावी याचा विचार करुन मी गोंधळून गेलो. असेही परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.
सचिन वाजे बरोबरच त्यांनी संजय पाटील यांच्या बरोबर काय झाले हे सुध्दा नमुद केले आहे. त्यात म्हटले आहे की, काही दिवसांनंतर मुंबईतल्या हुक्का पार्लरबद्दल चर्चा करायला गृहमंत्र्यांनी सोशल सर्व्हिस ब्रँन्चचे एसीपी संजय पाटील यांना त्याच्या निवासस्थानी बोलावले. तिथे त्यांचे स्वीय सहाय्यक पलांडे उपस्थित होते. दोन दिवसांनी डीसीपी भुजबळांसोबत एसीपी पाटील गृहमंत्र्याच्या कार्यालयाबाहेर वाट पाहत होते. तेव्हा पलांडेंनी त्यांना सांगितले की गृहमंत्र्यांना ४० ते ५० कोटी रुपये हवे आहेत जे मुंबईतील साधारण १७५० बार, रेस्तरॉ मार्फत जमवले जाऊ शकतात. एसीपी पाटलांनी हे काम करावे असे गृहमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती पाटील यांनी मला दिली. ही बैठक ४ मार्च या दिवशी झाली होती. पाटील यांना १६ मार्चला मी एक मेसेज पाठवून त्याची खात्री मी करून घेतल्याचे म्हटले आहे. त्यात त्यांनी पाटील यांच्यामधील जे संभाषण झाले ते या पत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे प्रकरणाची माहिती त्यांनी या पत्रात दिली आहे.
आता याच पत्रावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काय उत्तर दिले……
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल असे प्रसिध्द पत्रक गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले आहे. यात परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे असेही प्रसिध्दी पत्रात म्हटले आहे.
– सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते ? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही ?
– आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरून हटविण्यात येणार आहे. हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्च ला एसीपी पाटील यांना व्हॉटसअप chat वरून काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळविली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या chat च्या माध्यमातून परमबीर सिंग यांना पध्दतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या chat वरून उत्तरे मिळविताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या chat वरून आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहेत. याचा अर्थ काय ?
– १८ मार्च रोजी मी लोकमतच्या कार्यक्रमांमध्ये परमबीर सिंग यांच्याविरुद्ध काही गंभीर स्वरूपाच्या बाबी पुढे आल्यामुळे त्यांना पदावरून हटविले असल्याचे म्हटल्यानंतर परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचविण्याच्या दृष्टीने 19 मार्च रोजी पुन्हा व्हाट्सअप वर संभाषणाचे पुरावे तयार करण्याचा प्रयत्न केला.
– पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे व एसीपी संजय पाटील हे परम बीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. १६ वर्षे निलंबित असलेल्या वझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांनी स्वतःच्या अधिकारात घेतला.
– परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करीत आहे.
– स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंग यांनी हे खोटे आरोप केले आहेत.
– सचिन वाझे यांनी जर फेब्रुवारी मध्ये परमबीर सिंह यांना भेटून हे सर्व सांगितल्याचे परमबीर सिंग म्हणतात तर त्याच वेळी त्यांनी का सांगितले नाही. एवढे दिवस शांत का होते?
– विस्फोटक प्रकरणात आपण अडचणीत येऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी असे खोटे आरोप करून सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे.
– स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू या गंभीर प्रकरणाचा तपास भरकटविण्यासाठी परमबीर सिंग यांनी रचलेले हे षडयंत्र आहे
– मा. मुख्यमंत्री यांनी परमबीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी.
असे मुद्दे पत्रात मांडले आहे.
……..