नाशिक – शिक्षक दिनाच्या निमित्ताने साहित्यिक डॉ. यशवंत पाठक यांच्यावर ‘इंडिया दर्पण लाईव्ह’मध्ये लेख प्रसिद्ध झाला. भोगोलिक मर्यादा ओलांडत हा लेख थेट लंडनपर्यंत पोहचला. त्यामुळेच हा लेख लिहिणाऱ्या कवी विष्णू थोरे यांना थेट लंडनहून मेसेज पाठविला. त्यामुळे ही बाब उल्लेखनीय ठरली आहे.
महिन्याभरापूर्वीच वाचकांच्या सेवेत दाखल झालेल्या ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ची विविध पातळ्यांवर दखल घेतली जात आहे. शिक्षक दिनाला ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ मध्ये स्मरण डॉ. यशवंत पाठक यांचे हा कवी विष्णू थोरे यांचा लेख प्रसिद्ध झाला. या लेखास अनेक वाचकांचा अभिप्राय मिळाला. विशेष म्हणजे, लंडनहूनही या लेखा विषयी अभिप्राय मिळाला.
मनमाड महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या आणि सध्या लंडन येथे वास्तव्यास असलेल्या कल्पना जाधव-काकडे यांनी थोरे यांना मेसेज पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्या लिहितात की ,”मी आज तुमचा पाठक सरांवरचा ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ मधील लेख वाचला. तुमच्या आठवणी खूप छान शब्दात तुम्ही लिहिल्या. मी ही त्याच कॉलेजची. त्यामुळे लेख वाचता, वाचता मनमाड कॉलेजला फेरफटका मारून आपल्यासारखे वाटले.आणि माझ्याही काही आठवणी जाग्या झाल्या. ‘इंडिया दर्पण लाईव्ह’च्या माध्यमातून हे शक्य झाले.”
त्यामुळे अल्पावधीतच ‘इंडिया दर्पण लाईव्ह’ वाचकांच्या पसंतीस उतरल्याचे स्पष्ट होत आहे.