मुंबई – व्हॉट्सअॅपची प्रायव्हसी पॉलिसी ट्रोल झाल्यानंतर युझर्सने सिग्नल अॅपकडे मोर्चा वळवला आहे. मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅपही कायम ठेवले आहे, पण एकदा सिग्नल अॅपवर ट्राय करण्याची संधी कुणीही सोडलेली नाही. त्यामुळे हे अॅपही चांगलेच लोकप्रिय होऊ लागले आहे. हे अॅप देशभरात मोठ्या प्रमाणात डाऊनलोड केले जात आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोअरच्या टॉप फ्री डाऊनलोडींग अॅपमध्ये सिग्नलचा समावेश झाला आहे. व्हॉट्सएपला मोबाईलसोबत डेस्कटॉपवरही वापरले जाऊ शकते. त्याचप्रमाणे टेलिग्रामला लॅपटॉप, संगणकासह टेलीग्राफवर वापरले जाऊ शकते. हे दोन्ही प्लॅटफॉर्म एका वेगळ्या वेब व्हर्जनचे आहेत. पण सिग्नल अॅप तसे नाही. सिग्नलसाठी वेगळे वेब व्हर्जन नाही. पण ते लॅपटॉप किंवा पीसीवर वापरायचे असेल तर त्यासाठी आपल्याला अॅप डाऊनलोड करावे लागेल.
पीसी, लॅपटॉपवर कसे वापराल सिग्नल
सर्वांत पहिले आपल्याला वेब ब्राईजरवर सिग्नल अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी http://signal.org/download/. वर क्लिक करावे लागेल. सिग्नल अॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनसाठी डाऊनलोड फॉर विंडोज आप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ११६ एमबी साईझची फाईल इन्स्टॉल होईल. सेटींग मेन्यूमधून डेस्कटॉप अकाऊंटला लिंक केले जाऊ शकते. गेल्या काही दिवसांमध्य१ लाखांहून अधिक लोकांनी सिग्नल अॅप डाऊनलोड केले आहे, हे विशेष. २०२१ च्या पहिल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपच्या इन्स्टॉलेशनमध्ये ११ टक्क्यांनी घट झाली आहे.