सोमवार, सप्टेंबर 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लुटारू हॉस्पिटलला चाप लावण्यात सरकार अपयशी; भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

by Gautam Sancheti
ऑगस्ट 10, 2020 | 1:14 pm
in संमिश्र वार्ता
0

मुंबई – ‘कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह नको असेल तर फाटके कपडे घाला’ असे वक्तव्य करून काँग्रेसचे नेते व माजी गृहराज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे यांनी रुग्णांना लुटणाऱ्या खासगी रुग्णालयांना चाप लावण्यात महाआघाडी सरकार अपयशी ठरले आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी टीका प्रदेश भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

माजी गृहराज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे यांनी काँग्रेसच्या सोलापूरच्या बैठकीत ”चांगले कपडे घातले, सूट, बूट घातलं की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात. फाटके कपडे घातले की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्हचं येतात. अशी सगळी कोविडची परिस्थिती आहे. त्यामुळे या कोरोनाला घाबरण्याची गरज नाहीये. कोविड पॉझिटिव्ह नको असेल तर फाटके कपडे घाला. ” असे वक्तव्य केले आहे. एका जबाबदार व्यक्तीच्या तोंडून निघणाऱ्या या वक्तव्यावरून कोरोना चाचणी प्रक्रियेमध्ये काळबेरं आहे, सामान्य लोकांच्या जीवाशी कसा खेळ चालला आहे हे दिसून येतं, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी जर मातोश्रीबाहेर पडून ठिकठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली तर प्रशासनावर आणि आरोग्य यंत्रणेवर धाक राहिल. प्रत्यक्ष काम करण्याची गरज असते. प्रत्यक्ष कृती केल्याने ज्ञानात आणि अनुभवातही भर पडते हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे, असे उपाध्ये म्हणाले.

खासगी रूग्णालयांकडून, विलगीकरण केंद्राकडून रूग्णांकडून भरपूर पैसा उकळला जातो. रूग्णालयांत रूग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे, विलगीकरण केंद्रात महिला असुरक्षित आहेत, खासगी लॅबमध्ये रिपोर्टशी खोडसाळपणा होतोय अशात या सामान्य जनतेने कुणाकडे दाद मागावी? कुटुंबातल्या एका व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्या कुटुंबाला आर्थिक फटका तर बसतोच पण प्रचंड मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. अशात चाचणी करायला आलेल्या व्यक्तीचे राहणीमान पाहून रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दिला जात असेल तर सरकार आणि आरोग्य यंत्रणेने जनतेच्या जीवाचाच खेळ मांडला आहे असेच म्हणावे लागेल असे  उपाध्ये यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘महिला सुरक्षेवर भाषण नकोत तर हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे हे कृतीतून दाखवा’

Next Post

राज्यातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्या; म्हैसकरांकडे महसूल, अश्विनी जोशी वेटींगवर

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Education6ZT1 e1756688555854
संमिश्र वार्ता

आश्चर्य…थंड मीरा ताऱ्यांमुळे वैश्विक विस्ताराच्या स्वतंत्र दराच्या मापनाला मिळाला नवा आधार

सप्टेंबर 1, 2025
WhatsApp Image 2025 08 30 at 5.36.53 PM
संमिश्र वार्ता

श्री साईबाबा संस्थानची ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

सप्टेंबर 1, 2025
shinde fadanvis pawar1 e1710312448933
महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनावर आज तोडगा निघणार? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची रात्री उशीरा बैठक

सप्टेंबर 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोठेही पैसे गुंतवू नका, जाणून घ्या, सोमवार, १ सप्टेंबरचे राशिभविष्य

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 192907 Facebook
स्थानिक बातम्या

धक्कादायक…नाशिक येथे नंदिनी नदीमध्ये स्फोटके…हजारो कांड्या गोण्यामध्ये मिळाल्या

ऑगस्ट 31, 2025
Screenshot 20250831 144755 Facebook
महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी आता सरकारला नवा पर्याय…केले हे आवाहन

ऑगस्ट 31, 2025
Sushma Andhare
महत्त्वाच्या बातम्या

सुप्रिया सुळेंची गाडी रोखली, गाडीवर बाटल्या फेकल्या…ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची ही प्रतिक्रिया चर्चेत

ऑगस्ट 31, 2025
ycmou gate 6
स्थानिक बातम्या

मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस या तारखेपर्यंत मुदतवाढ

ऑगस्ट 31, 2025
Next Post
mantralay 640x375 1

राज्यातील सात अधिकाऱ्यांच्या बदल्या; म्हैसकरांकडे महसूल, अश्विनी जोशी वेटींगवर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011