मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लिव्ह-इन रिलेशन : अलाहाबाद हायकोर्टाने दिला हा महत्त्वपूर्ण निर्णय

by India Darpan
जानेवारी 20, 2021 | 2:28 pm
in संमिश्र वार्ता
0
court

अलाहाबाद –  जर विवाहित स्त्री दुसर्‍या पुरुषाबरोबर बायकोप्रमाणे जीवन जगत राहिली तर ते नाते लिव्ह-इन रिलेशन मानले जाऊ शकत नाही. तो भारतीय कायद्यानुसार गुन्हा ठरणार आहे, त्याकरिता दुसर्‍या पुरुषाने त्या महिलेबरोबर राहण्यासाठी लग्न केले पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान दिला आहे.

कोर्टाने म्हटले आहे की, कायदेशीर अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा त्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि एखाद्या गुन्हेगाराचे संरक्षण करण्यासाठी हा आदेश जारी केला जाऊ शकत नाही. जर गुन्हेगारास संरक्षित करण्याचे आदेश दिले गेले, तर ते गुन्ह्याचे संरक्षण करण्यासारखे असेल. कोर्ट हे कायद्याच्या विरोधात आपल्या अधिकारांचा वापर करू शकत नाही, असेही कोर्टाने बजावले.
न्या.एस.पी. केशरवाणी आणि न्यायमूर्ती डॉ. वाय. के. श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने हाथरस जिल्ह्यातील ससनी पोलिस ठाणे परिसरातील आशा देवी आणि अरविंद यांची याचिका फेटाळताना हा आदेश दिला आहे. आशा देवीचे लग्न महेशचंद्रशी झाले आहे. दोघांमध्ये घटस्फोट नाही. पण, एक स्त्री ही पती सोडून दुसर्‍या पुरुषाबरोबर नवरा-बायकोप्रमाणेच राहते. ती स्त्री म्हणाली की ते दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जगत आहेत.  त्यांचे कुटुंबातील सदस्यांपासून संरक्षण केले पाहिजे. कोर्टाने म्हटले की, लग्न झालेल्या व्यक्तीचे दुसऱ्याशी असे संबंध असणे गुन्हा आहे.      कोर्टाने म्हटले आहे की, धर्मांतर करून एखाद्या विवाहित महिलेबरोबर लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणे देखील गुन्हा आहे. यासाठी पुरुष अपराधी असून ते बेकायदेशीर आहे. अशा संबंधांना कायदेशीर मानले जाऊ शकत नाही. कोर्टाने म्हटले आहे की, जे लोक कायदेशीररित्या लग्न करू शकत नाहीत, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात, तेव्हा एकापेक्षा जास्त जोडीदाराशी संबंध ठेवणे देखील गुन्हा आहे. अशा लोकांना कोर्टाचे संरक्षण दिले जाऊ शकत नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकरोडचा पाणीपुरवठा सोमवारपासून सुरळीत होणार; वाढीव पाणी देण्याची व्यवस्था

Next Post

पेट्रोल पंपाची बनावट जाहिरात, इंजिनिअरला लाखोंचा गंडा

India Darpan

Next Post
cyber crime

पेट्रोल पंपाची बनावट जाहिरात, इंजिनिअरला लाखोंचा गंडा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011