नाशिक – महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्यामुळे नाशिक मधील महसूल कर्मचा-यांनी आनंद व्यक्त केला. नाशिक कर्मचारी महसुल संघटनेच्या पदाधिका-यांनी एकमेकांना पेढेही वाटले. राज्य शासनाने हा निर्णय़ घेतल्यामुळे कर्मचारी संघटनचे सरचिटणीस नरेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष दिनेश वाघ, सचिव जयंत लिलके, उन्मेश रत्नाकर, महिला प्रतिनिधी वंदना महाले, शिल्पा धोळपकर, जीवन आहेर, दीपक सोमण, महेश सावंत, आनंद लगरे, योगेश कोतवाल, पी. वाय. देशपांडे, रमेश मोरे, विलास वैद्य, प्रफुल्ल कोटगिरे, पोपटराव सोनवणे, प्रवीण गोंडाळे, तुषार नागरे, उन्मेश रत्नाकर, हर्षल गायधनी, सचिन मारके, धनश्री कापडणीस यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची राज्यातील महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘लिपिक गट क‘ कर्मचाऱ्यांची तांत्रिक लिपिक ऐवजी ‘महसूल सहायक‘ असे पदनाम करावे अशी मागणी होती. राज्य शासनाने महसूल कर्मचारी संघटनेची ही मागणी मान्य केली आहे.