लासलगाव -ं नियमांचे उल्लघंन करतांना आढळुन आलेल्या सहा व्यावसायिकांवर ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी कारवाई केली. या कारवाईत सहा ६ दुकाने सील करुन ६ हजार २०० रुपये दंड आकारणी करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी यांनी शहरात स्वतः फिरुन सुरु असलेले विनापरवानगी व्यवसायांवर धाड सत्र सुरु करत कार्यवाही केली. यावेळी त्यांनी शासनाच्या नियमांचे उल्लघन करु नये असे आवाहनही केले.
पाटील यांनी व्यावसायिकांना आवाहनही केले. ते म्हणाले की, जे व्यावसायिक अत्यावश्यक सेवा आणि घर पोहोच सेवा पुरविणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी कोवीड-१९ निगेटिव्ह (आरटीपीसीआर किंवा आरएटी) सर्टीफिकेट आणि ओळखपत्र जवळ बाळगणे गरजेचे आहे. सदरचे सर्टीफीकेट १५ दिवस ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा टेस्ट करणे गरजेचे राहणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहीती मिळाल्यानंतर परिसरामध्ये सॅनिटाझर करण्यात येते. तसेच विलगीकरण कक्ष महावीर विद्यालयामध्ये सुरु करण्यात आलेले आहे. तसेच गावठाण परिसरामध्ये ९ कंटेनमेट झोन व नवीन एनए वसाहतीमध्ये रुग्णांच्या घराला प्रतिबंधीत क्षेत्राचे फलक लावण्यात आलेली आहेत. सदरचे फलक जर परस्पर काढून घेतले तर त्याबाबत शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. याची माहीती देण्यासाठी लेखी नोटीसही देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली.