लासलगाव – शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार लोकनेेते गोपिनाथजी मुंढे यांच्या ७१ व्या जयंती व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवस निमीत्त लासलगाव तालुका शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात ७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. लासलगांव बस स्थानकात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलजी वाघ, मंडल अधिकारी आर.एन. बच्छाव, बस डेपो मॅनेजर समर्थ शेळके साहेब, वीज वितरण कंपनीचे सहाय्य्क अभियंता रोशन धनवीज, डॉक्टर असोशियशनचे अध्यक्ष डॉ. विजय केंगे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. या शिबिरासाठी, राष्ट्रवादीची सरचिटणीस बबनरावजी शिंदे, डॉ. विलास कांगणे, डॉ. सुजित गुंजाळ, डॉ. श्रीकांत आवारे, डॉ. कैलास पाटील, डॉ. सुरेश दरेकर, शहर प्रमुख प्रमोद पाटील, पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, उत्तमराव वाघ, विकास कोल्हे, प्रविण कदम, विशाल पालवे, किरण गिते, संतोष पवार, मन्सुर भाई शेख, निशांत केंगे, मंदार खानापुरकर, राजेंद्र कराड, रविराज बोराडे ,रोहित पांडे, दत्ता पाटील, पप्पुशेठ पंजाबी, शेरू रंगरेज, गुलाब रंगरेज, रोहित जगताप, राम बोराडे , कैलास डुंबरे, कैलास कहांडळ, दत्तात्रय भांबारे, नवनाथ आहेर ह.भ.प.बाळासाहेब शिरसासाठ, संजय लंबे, किरण शिंदे,आनंद टुपके, जितेंद्र फापाळे, प्रविण निरगुडे, योगेश क्षिरसागर, संतोष कानकाडे, संतोष कोकणे, स्वप्नील जगताप , विलास पाटील, उत्तम जाधव, शंकर आंधळे, बबन वाकचौरे, गणेश धुमाळ, शरद रोटे, अशोक उखार्डे, दत्ता बोराडे, अंकुश पांडे, लक्ष्मण सांगळे यासह नागरीक व पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरासाठी लासलगांव आगार सर्व एस.टी. कर्मचारी, लोकनेते गोपीनाथ मुंढे संघर्ष समिती,डॉक्टर असोशिएशन,लासलगांव बाबा अमरनाथ ग्रुप,लासलगांव,लासलगांव शहर विकास समिती, समता रक्त पेढी, नाशिक यांनी सहकार्य केले. तसेच रक्त दाते व उपस्थित पदाधिकारी ,नागरिकांचे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी आभार मानले.