लासलगाव – लासलगाव शहरातील नाज़-ए-वतन बहुउद्देशिय सामाजिक संस्था तसेच समस्त मुस्लिम बांधवातर्फे लखनऊ येथील शिया वक्फ बोर्ड अध्यक्ष असलेला वसीम रिझवी याने मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल येथील पोलिस ठाण्यात निवेदन देऊन वसीम रिझवी याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन निषेध व्यक्त करण्यात आला .
यावेळी नाज-ए-वतन सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा फरीदा काजी, लासलगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच अफजल शेख, पिंपळगाव नजीक ग्रामपंचायत सदस्य लतीफ तांबोळी, साजिया शेख, ब्राम्हणगाव ग्रामपंचायत सदस्य तब्बसुम मंसुरी, मौलाना फारूक, संस्थेचे उपाध्यक्ष मिरान पठाण ,जमा शेख, लियाकत मंसुरी, बिस्मिल्ला शहा, मोहम्मद रंगरेज, करीम तांबोळी, रफिक तांबोळी, रिजवाना तांबोळी, शीरीन शेख व समस्त मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते