लासलगाव – लासलगाव ग्रामपंचायततर्फे राष्ट्र संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश सर्जेराव पाटील, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील तलाठी केदार साहेब यांच्या शुभहस्ते पुजन करून, पुप्षहार अर्पण करण्यात आले.
ग्रामविकास अधिकारी शरद पाटील आणि माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी संत गाडगेबाबांच्या कार्याचे महत्व सांगितले. यावेळी त्यांनी संत गाडगेबाबांनी सांगितलेले स्वच्छतेचे महत्व, अंधश्रद्धा निर्मूलन, सर्व धर्म समभाव, या त्यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी ते पुढे म्हणाले की, संत गाडगेबाबांचे कार्य घराघरात गल्लीगल्लीत गावागावात पोहोचवून निरोगी बलशाली समाज कसा तयार होईल यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले, या कार्यक्रमात प्रिन्स बल्ला ,सुनील दराडे, अब्बास रंगरेज, शेरु रंगरेज, सुधाकर शेजवळ, इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.