लासलगाव – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आज शासकीय नियमांचे पालन करुन लासलगाव येते साजरी करण्यात आली. या प्रसंगी लासलगाव पोलिस ठाणेचे सहा पोलिस निरीक्षक राहुल वाघ, जिप सदस्य डी. के. जगताप, नाशिक जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सदस्य सचिन होळकर, लासलगाव ग्रामपालिका उपसरपंच अफजल शेख, ग्रामसेवक शरद पाटील, ग्रा. प सदस्य तथा आर पी आय शहराध्यक्ष रामनाथ शेजवळ, ब्राम्हणगावचे नवनिर्वाचित उपसरपंच राहुल शेजवळ,माजी प . स . सदस्य प्रकाश पाटील , यांनी पुष्पाहार अर्पण करुन मानवंदना दिली.
बौद्धाचार्य मिलिंद गायकवाड यानी सामुहीक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले. समता रक्तपेढी नाशिक व डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती संधान नगर , टाकळी व लासलगाव यांच्या सयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
समता रक्तपेढीचे कार्यकारी संचालक राकेश वाघ यांच्या हस्ते जयंती उत्सव समितीचे समन्वयक डॉ अमोल शेजवळ यांना सन्मानचिन्ह चिन्ह देउन उत्सव समितीचा गौरव करण्यात आला. तसेच रिटायर्ड मेजर आयु नंदु केदारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील गाजलेली भाषणे या पुस्तिकेचे वाटप केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी कैलास केदारे, भास्कर शेजवळ , चंद्रकांत शेजवळ , सोनु शेजवळ , राहुल शेजवळ , बबलु शेजवळ , नितीन शेजवळ ,सागर आहीरे , मनोहर आहीरे ,मंगेश आहीरे , करण विस्ते ; विकास खंडीझोड ; आकाश गरुड , अर्शद शेख , बाळासाहेब सोनवणे ,अशोक गायकवाड , प्रकाश संसारे , शहजाद पठाण ; नाना सुर्यवंशी ; सनि पाठक , शाम साळवे , राम साळवे , सतिश संसारे , संघराज एळींजे , सुनिल पगारे , सचिन पगारे , किरण लोखंडे , बौद्धाचार्य प्रविण शिरसाठ , प्रविण जाधव ,संदेश पगारे , विलास खैरनार , भास्कर नेटारे तसेचमहीला वर्गात सौ सुशिला शेजवळ, रमण शेजवळ, निर्मला शेजवळ आदी उपस्थित होते