लासलगाव – भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमी दिनी १९५६ साली लाखो समूहाला नागपूर येथे बौद्ध धम्माची दिक्षा दिली. आणि एक मोठी धम्मक्रांती घडवून आणली, असे प्रतिपादन डॉ अमोल शेजवळ यांनी केले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
रमणताई शेजवळ यानी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण केला. त्यानंतर सुशिलाताई शेजवळ यानी त्रिसरण पंचशिलाचे पठण केले. कॉंग्रेसच्यावतीने सचिन होळकर यांनी बाबासाहेबांचे कृषीक्षेत्र, अर्थशास्त्र तसेच भारतीय संविधान निर्मितीचे योगदान विषद केले. मा पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी बाबासाहेबांच्या एकात्मतेच्या विचारांवर प्रकाश टाकला. यावेळी रिपाई शहराध्यक्ष रामनाथ शेजवळ, शहराध्यक्ष सोनु शेजवळ, ब्लु टायगर गृपचे सागर आहिरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस युवा आघाडीचे अर्शद शेख, व्हीजन ॲकॅडमीचे संचालक अमोल संसारे, नुमान शेख, आर. ए गृपचे शहराध्यक्ष शामभाऊ साळवे, करण साळवे, भास्कर शेजवळ, बद्री शेजवळ, संघराज एळींजे, मनोज शेजवळ, मिलिंद गायकवाड, अशोक गायकवाड, रमेश कर्डक, अविनाश पगारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विकास खंडीझोड यांनी केले.