लासलगाव – शेतजमीनीला नाव लावून देण्यासाठी ३५०० रुपयांची लाच घेतांना लासलगावचे मंडळ अधिकारी रमेश निंबा बच्छाव हे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले. या लाचेबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर बुधवारी या विभागाने सापळा रचला. या सापळ्यात निफाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीती ही लाच घेतांना बच्छाव अडकले. गेल्या काही दिवसापासून लाच घेण्याचे प्रकार उघडकीस येत आहे. त्यात लासलगाव येथील प्रकरण समोर आले आहे.