लासलगांव – लासलगाव बाजारसमितीतील कांदा लिलावाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहणार असल्याची माहिती बाजारसमितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली आहे. कांदा लिलाव बंद ठेवण्याबाबत व्यापाऱ्यांनी अधिकृत पत्र दिलेलं नसल्याचेही त्यांनी सांगितले.त्यामुळे कांदा लिलावावरून व्यापारी आणि बाजारसमिती आमनेसामने आल्याचे चित्र आहे. यावेळी त्यांनी कांदा विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या कांदा खरेदीसाठी बाजारसमितीकडून वेगळी व्यवस्था करण्यात येईल असेही सांगितले.