लासलगाव – शिवसेना येवला – लासलगाव विधानसभा मतदार संघ निफाड पूर्वच्या वतीने केंद्र सरकारला जाग येण्यासाठी तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्कल व तलाठीला निवेदन देण्यात आले. या निवेंदनात म्हटले आहे की, १२ डिसेंबर रोजी पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तुंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहे. त्या कमी कराव्या या बाबत निवेदन दिले होते. पण, ५० दिवस उलटले तरी या बाबत केंद्र शासनाने काही निर्णय घेतला नाही. सर्व सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहे. सध्या कोविड-१९ मुळे गेल्या वर्षापासून प्रत्येकाचा रोजगार गेला आहे. तसेच उद्योग व्यवसाय बंद पडलेले आहे. त्यामुळे किमान गरजा भागविणे सुध्दा कठीण झाले आहे. अशातच महागाईमुळे नागरीक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहे.तात्काळ पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती आवाक्यात आणाव्या अन्यथा मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल याची दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
या आंदोनाबाबत तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील म्हणाले की, निवेदन दिल्यानंतरही निर्णय न घेतल्यामुळे ढोल-ताशांच्या गजरात लासलगाव तलाठी कार्यालय येथे ढोल-ताशांचा गजर करून निषेध आम्ही केला. या आंदोलनात निवृत्ती जगताप,उत्तम वाघ ,प्रमोद पाटील,सोमनाथ गांगुर्डे,विकास रायते,राजा भाऊ दरेकर,शिवा सुराशे,विकास रायते,सोमनाथ गांगुर्डे,गुलाब भाई तांबोळी,भगवान बोराडे,रविराज बोराडे,आनंद तुपके,उषा कुमावत,अश्विनी पाटील,शुभांगी बोराडे,योगिता खैरे,सुमन बोराडे, अनिता रोटे,मनीषा पाटील,मिराबाई पाटील,बाळासाहेब जगताप,बाळासाहेब शिरसाट,पप्पू शेठ पंजाबी,अवतारसिंग गील ,लियाकतभाई तांबोळी,राकेश ठाकरे,राकेश रायते,विक्रम शिंदे,राजेंद्र जाधव,गोकुळ शिंदे ,सागर रा यते,संतोष पवार ,रोहित पांडे, राजेंद्र जाधव,सद्दाम शेख,संतोष रायते,आकाश साठे ठाकूर फिटर ,चिंगु तिवारी,दीपक जोशी,मिंटू पंजाबी,संतोष पंजाबी,मोहन आव्हाड,अंकुश गरुड ,दादा वाघ मिलिंद निकम ,दिपक गायकवाड आयुबभाई पाट्यावाले जय सिंग ठाकूर ,करीम भाई ,सचिन वाघ ज्ञानेश्वर नेटारे,सलीम शेख, राजाभाऊ कुंदे,संतोष बोराडे हे सहभागी झाले होते.
यावेळी सर्कल विजय संपतराव आहेर, तलाठी नितीन रघुनाथ केदार यांना पेट्रोल डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूंची किंमत कमी होणे व महागाई कमी होणे बाबत द्वितीय स्मरण पत्र देण्यात आले. केंद्र सरकारला जाग येण्यासाठी तलाठी कार्यालय येथे केंद्र सरकारला जाग यावी म्हणून ढोल-ताशांचा गजर करून निषेध करण्यात आला तसेच युवा सेनेचे अविनाश चव्हाण यांनी मोदीचा पेहराव केला. यावेळी महागाईमुळे नागरिकांना चहाऐवजी लिंबूपाण्याचे वाटप करण्यात आले.