लासलगाव.- देवगाव फाट्यानजीक एक तरुण व तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अद्याप पोलिसांकडुन अधिकृत माहीती मिळाली नाही तरी हाती आलेल्या वृत्तानुसार निफाड तालुक्यातील व लासलगाव पोलीस कार्यालयाचे हद्दीतील,भरवसफाटा कोळपेवाडी राज्य महामार्ग क्र.७ देवगाव फाट्यानजीक भाऊसाहेब भीमराव शिंदे यांच्या गट नं.१८६ या विहीरीत गुलाबी साडी,काळा टॉप,पिवळी लेगीज,उजव्या हातात घड्याळ,डाव्या हातात कडे,पायात बाजारातील तोरड्या,गळ्यात बाजारू मंगळसूत्र अशा पेहरावातील २२ ते २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पो.कॉ.डी.के.ठोंबरे,डी.डी.पा नसरे,पो.हवा.कोते,किशोर वाणी,मस्तागर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दरम्यान आज सायंकाळी आठ वाजे च्या दरम्यान आणखी एक तरुणाचा मृतदेह फुगून वर आला आहे. काल सकाळी येथे सागर भाऊसाहेब वेताळ यांच्या मालकीची एम एच ४१ ए.एच ७५६० ही मोटार सायकल आढळून आली होती.याबाबत लासलगाव पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून,काही माहिती असल्यास लासलगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन लासलगावचे सहा.पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले आहे.
दरम्यान मयत असलेला भाऊसाहेब वेताळ (२१) रा. येसगाव (मालेगाव) असल्याचे पोलिसांनी सांगितले.