लासलगाव – येथील रेल्वे स्टेशन कडे जाणारा दहा लक्ष रुपयाचे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आज निफाड पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य शिवा पाटील सुराशे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी सरपंच अश्विनी जाधव, उपसरपंच ज्ञानेश्वर मोकाटे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते.
रेल्वे स्टेशन व लासलगाव परिसरातील रेल्वेने जाणार या नागरिकांची बऱ्याच दिवसापासून असलेली मागणी लक्षात घेता शिवा सुरासे यांनी तात्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मार्फत मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत या रस्त्याच्या कामासाठी दहा लक्ष रुपये मंजूर करून आणले होते. त्या कामाचे उद्घाटन आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले .मनोगतात शिवा पाटील सुरासे यांनी सांगितले की, टाकळी विंचुर ग्रामस्थांनी सलग तिसऱ्यांदा ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याकडे दिली. यापूर्वी अनेक विकास कामे टाकळी विंचुर मध्ये झाली. परंतु आता राज्य सरकारपासून ग्रामपंचायती पर्यंत सर्व सत्ता आपल्याकडे असून पुढील विकास कामे करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. राहिलेली विकास कामे उर्वरित पाच वर्षांमध्ये करण्यात येतील असे ते म्हणाले.
टाकळी विंचुर सह खडक माळेगाव गणांमध्ये बरीच कामे मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्याही कामांना लवकरच सुरुवात करण्यात येईल असेही शिवा पाटील सुरासे म्हणाले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नाना राजगिरे, हरीश गवळी, ज्योती सुरासे,पूनम आमले ,संगीता पाचोरकर अशोक आमले संतोष केंदळे राजेंद्र कुयटे प्रकाश शर्मा राम कदम ,दत्तू सुरासे, तुळशीराम सुरासे ,सदाशिव शिंदे ,गणेश जाधव, पांडुरंग जाधव, निर्मल शर्मा, शिराज शेख ,राजू शेख, संतोष निंबाळकर,नाना कवर, नाना जाधव यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होते