लासलगाव – लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीत २५ मार्च रोजी दुपरी २.१५ वाजता रेल्वे स्टेशन रोडरील जम्बो पाववडा सेंटर जवळून चांदवड तालुक्यातील रायपूर येथील दत्तात्रय वाल्मिक कोल्हे यांच्या स्विफ्ट कारमधून युनिकॉर्न व शाईन मोटारसायकलवर अज्ञात चार इसम येवून ३ लाख ५० हजार रुपयाची रोख रक्कमेची बॅग चोरून नेली आहे. या घटनेतील आरोपीचे CCTV फुटेज मिळाले आहे. पोलिसांनी त्यातून फोटो काढून तो प्रसिध्दीस दिला आहे. घटनेची कोणाला माहिती मिळाल्यास लासलगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.