लासलगाव – लासलगाव येथे कित्येक दिवसापासून जीर्ण झालेले पोल व तारा बदलण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केली होती. त्याची दखल घेऊन महावितरण कंपनीने नवीन सिमेंट पोलला मंजुरी दिली. परंतु, संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्ज्याचे पोल आणल्यामुळे जागरूक नागरीकांनी फोन करुन शिवसेनेच्या पदाधिका-यांना ही माहिती दिली. त्यानंतर शिवसेनेने हा प्रकार वीज वितरण कंपनीचे चांदवड डिव्हजनचे कार्यकारी अभियंता आव्हाड साहेब यांना सांगितला. त्यांनी तात्काळ लासलागव उपकार्यकारी अभियंता सोनवणे व शहराचे सहाय्यक अभियंता रोशन धनवीज यांना घटनास्थळी समक्ष भेट देण्याचे आदेश दिले. त्यांनी तत्काळ जागेवर येऊन पंचनामा करून संबंधीत ९ निकृष्ठ दर्ज्याचे पोल ठेकेदारास बदलण्यास सांगितले. या प्रसंगी लल्लुशेठ ब्रम्हेचा, सचिन मालपाणी, अनिल सोनवणे, प्रविण कदम, बाळुसाहेब खंडीझोड, संदिप जगताप, नितीन शेजवळ, बबनराव शरंदे, अविनास देसाई, नानासाहेब सुर्यवंशी, वसिम शेख, कचेश्वर जगताप, स्वप्निल डुंगरवाल, देवेंद्र फापाळर, अश्विन शिंदे, राहुल गवळी, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अरशद शेख, किशोर परेराव व नागरिक उपस्थीत होते. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधीत ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याचे नाव काळ्या यादीत टाकण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केली. त्याबाबतची तक्रार ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे करणार आहे.